Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

दरोड्याच्या गुन्ह्यातील चौघांच्या मुसक्या आवळल्या

शेवगाव पोलिसांची कारवाई । एक आरोपी पसार; सर्व आरोपी शेवगावमधील

शेवगाव । वीरभूमी - Jun 11, 2022 • 10:45 PM 791 views
पायी जाणार्‍या एकाला दोन दुचाकी अडव्या लावून लुटणार्‍या टोळीतील पसार झालेल्या पाच पैकी चार आरोपींना पकडण्यात शेवगाव पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी पकडलेल्या आरोपीमध्ये इरफान रफिक शेख (वय 21), जहीर उर्फ जज्जा नवाज शेख (वय 20), सोमनाथ रामनाथ गवते (वय 22), अरबाज शहाबुद्दीन शेख (वय 21) (सर्व रा. शेवगाव) यांचा समावेश आहे.

या आरोपींना आज (शनिवारी) कोर्टासमोर हजर केले असता त्यांना मंगळवार दि. 14 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर शाहरुख पटेल (वय 23) हा आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

याबाबत माहिती अशी की, 35 वर्षीय फिर्यादी हे शनिवार दि. 6 रोजी शेवगाव ते नेवासे रस्त्यावरील बाँम्बे मशिनरी समोरुन रात्री 9.15 वाजता पायी चालले होते. त्याच वेळी त्यांच्या समोर एका पल्सरवर तीन व स्कुटीवर बसुन दोन जण येवून थांबले. या पाच जणांनी फिर्यादीला अडवून त्यांच्याकडील अ‍ॅपल आयपॅड असलेली बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने आरडाओरड केल्याने आरोपी पळून गेले.

याबात त्यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तेव्हा पासून आरोपी पसार होते. पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांनी तत्काळ आरोपींचा शोध घेवून गुन्ह्याचा तपास लावण्याच्या सुचना दिल्या होत्या.

त्यानुसार पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके, रवींद्र बागूल, विश्वास पावरा या अधिकार्‍यांसह सहाय्यक फौजदार भगवान बडधे, पो.हे.कॉ. पांडुरंग वीर, पुरुषोत्तम नाकाडे, अशोक लिपणे, सुधाकर दराडे, प्रविण बागुल, सुखदेव धोत्रे, किरण टेकाळे, रवींद्र शेळके, सोमनाथ घुगे, महेश सावंत, बप्पासाहेब धाकतोडे, हरी धायतडक, वासुदेव डमाळे, अस्लम शेख, शहाजी आंधळे, संपत खेडकर, समीर फकीर, संतोष धोत्रे, संगिता पालवे, प्रियंका शिरसाठ आदींची तीन पथके तयार करुन आरोपींचा शोध घेतला असता इरफान रफिक शेख (वय 21), जहीर उर्फ जज्जा नवाज शेख (वय 20), सोमनाथ रामनाथ गवते (वय 22), अरबाज शहाबुद्दीन शेख (वय 21) या चार आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

या सर्व आरोपींवर दरोड्याचा गुन्हा दाखल करुन आज शनिवार दि. 11 रोजी कोर्टासमोर हजर केले असता त्यांना मंगळवार दि. 14 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यातील शाहरुख पटेल हा आरोपी पसार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी हे करीत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply