Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

विधान परिषदे पाठोपाठ माजीमंत्री राम शिंदेंवर आणखी मोठी जबाबदारी

विधान परिषदे पाठोपाठ माजीमंत्री राम शिंदेंवर आणखी मोठी जबाबदारी

कर्जत । वीरभूमी- Jun 16, 2022 • 09:44 PM 1130 views
माजीमंत्री राम शिंदे यांच्यावर भाजपा पक्ष श्रेष्ठींनी विधान परिषदेच्या उमेदवारी पाठोपाठ बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. राम शिंदे यांची बारामती लोकसभा मतदार संघाच्या प्रभारीपदी निवड केल्याने कर्जत-जामखेड मतदार संघातून शिंदे समर्थकांमधून स्वागत होत आहे.

माजी मंत्री राम शिंदे यांना नुकतीच विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली. या पाठोपाठ भाजपा पक्ष श्रेष्ठींनी राम शिंदे यांची बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. गुरुवारी संध्याकाळी भाजपाचे विरोधीपक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम शिंदे यांची नियुक्ती केली असल्याचे मुंबई येथे जाहीर केले.

यावेळी राम शिंदे यांच्यासह भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजीमंत्री आ. गिरीश महाजन उपस्थित होते. नुकतेच भाजपाकडून राम शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी देत त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे.

या निवडीमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे विद्यमान आ. रोहित पवार यांना शह देण्यात आला होता. त्या पाठोपाठ राम शिंदेंना बारामती लोकसभा क्षेत्रासाठी प्रभारीपदी नियुक्ती दिल्याने कर्जत-जामखेड मतदारसंघात या नियुक्तीचे भाजपाकडून स्वागत करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply