Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

विजयाचा गुलाल रंगला रक्ताने

देवराई सोसायटी निवडणुकीनंतर दोन गट भिडले । तलवारीने वार; तीन जखमी एक ठार

पाथर्डी । वीरभूमी - Jun 18, 2022 • 11:08 PM 8266 views
सध्या सोसायटी निवडणुकीचा धुराळा प्रत्येक गावात उडत आहे. मात्र पाथर्डी तालुक्यातील देवराई सेवा सोसायटी निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट काठ्या तलवारी घेऊन भिडले. या वादात तलवारीने झालेल्या हल्ल्यात चार जण गंभिर जखमी झाले. जखमींपैकी एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सोसायटी निवडणुकीच्या विजयाचा गुलाल रक्ताने माखल्याने तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील देवराई सेवा सोसायटीसाठी आज शनिवारी मतदान झाले. मतदानानंतर मतमोजणी होवून सत्ताधारी गटाला 11 तर विरोधकांना दोन जागांवर विजय मिळाला.

सोसायटीच्या निकालानंतर विजयी गटाने गुलालाची उधळण करत मिरवणूक काढली. यावरून दोन्ही गट एकमेकांना भिडले. या वादात तलवारीने हल्ला झाल्याने चार जण जखमी झाले.

या जखमीपैकी एकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलन केले.

घटनेची माहिती कळताच पाथर्डी व शेवगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ आरोपींच्या अटकेसाठी पथक रवाना केल्याने ग्रामस्थ शांत झाले.

तलवारीने झालेल्या मारामारीत देवराई येथील अजय गोरख पालवे, विष्णू कैलास पालवे, मनोहर नवनाथ पालवे, वैभव कैलास पालवे, सुमन नवनाथ पालवे यांचा समावेश असून यातील अजय पालवे याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समजली आहे.

पोलिस आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले असून जखमींवर उपचार सुरु आहेत. या घटनेने पाथर्डी तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply