Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

तलावात बुडून दोघा भावांचा मृत्यू

मेंढ्या धुतांना घडली दुर्दैवी घटना

करंजी । वीरभूमी- Jul 04, 2022 • 04:22 PM 4611 views
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे बोरुडे तलावात मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या संदिप व बापु अकोलकर या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की संदीप दत्तू अकोलकर (वय २९) व बाप्पू दत्तू अकोलकर (वय २७) हे सख्ये भाउ त्यांची शेती असलेल्या हाडे वस्ती जवळील बोरुडे तलावालगत असलेल्या भागात मेंढया चारण्यासाठी गेले होते. मेंढ्या काही वेळ चारून झाल्यानंतर पाणी पाजण्यासाठी तलावामध्ये डबक्यात असलेल्या पाण्यावर ते गेले.

मेंढ्यांचे पाणी पिऊन झाले नंतर संदीप पाण्यात उतरून मेंढ्या देऊ लागला. मेंढ्या धूत असतानाच संदीपचा पाय खोलात गेला व त्याने लहान भाऊ बापूला आवाज दिला. बापूने हात दिला व संदीपला वर काढू लागला.

या ओढाताणीत बापूच पाण्यात गेला. दोघेही पाण्यात पडले दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. दोघेही पाण्यात पडल्याचे लांबूनच संदीपच्या पत्नी सोनाली ने हे पाहिले व तिने आरडाओरड केली.

त्यानंतर नामदेव अकोलकर, दादा मुखेकर यांनी या दोघा भावांना पाण्यातून बाहेर काढले परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. दोघांही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डी येथे नेण्यात आले आहेत.

दत्तू बाबू अकोलकर हे अत्यंत गरीब व शांत कुटुंब होते. मजुरी व मेंढ्या पाळणे यावरच त्यांचा उदरनिर्वाह ते करत होते. संदीप यास एक तीन महिन्याचा मुलगा आहे.तर बाप्पू अकोलकर हा अविवाहित होता.

एकाच कुटुंबातील सख्या दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने करंजी गावात शोककळा पसरली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply