Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

चोराचीवाडी सेवा संस्थेवर शिवसेनेचा झेंडा

अध्यक्षपदी पुष्पा साळुंके; उपाध्यक्षपदी भिमराव लांडगे

श्रीगोंदा । वीरभूमी - Jul 13, 2022 • 01:47 PM 866 views
श्रीगोंदा तालुक्यातील चोराचीवाडी विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चेअरमनपदी शिवसेना तालुका उपप्रमुख निलेश साळुंके यांच्या मातोश्री पुष्पा बाळासाहेब साळुंके तर व्हाईस चेअरमनपदी भिमराव ज्ञानदेव लांडगे यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे तालुक्यात एकमेव चोराचीवाडी सेवा संस्था शिवसेनेच्या ताब्यात आली आहे.

नुकतीच ही निवडणूक हनुमान किसानक्रांती पॅनल व भैरवनाथ शेतकरी विकास पॅनल मध्ये अत्यंत चुरशीची झाली होती. आरोप प्रत्यारोपांनी गाजलेल्या निवडणूकीत भैरवनाथ शेतकरी विकास पॅनलने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.

शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दूतारे यांच्या नेतृत्वाखाली जोडल्या गेलेल्या अनेक उच्च सुशिक्षित तरुणांपैकी तालुका उपप्रमुख निलेश साळुंके यांनी मिळवलेल्या नेत्रदीपक विजयामुळे ही संस्था शिवसेनेच्या ताब्यात आली आहे. नवनिर्वाचित संचालक विठ्ठल चोर, तुकाराम चव्हाण, नरसिंग थोरात, कालिदास चोर, प्रशांत चोर, पंकज अनभुले, अशोक लांडगे, सुरेखा राजू चोर, संतोष उदमले व स्वप्निल बिबे यांनी मोठया मताधिक्याने विजय मिळवला आहे.

नूतन पदाधिकार्‍यांचे शिवसेनेचे माजी मंत्री शंकरराव गडाख, जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, जिल्हाप्रमुख शशिकांतजी गाडे, युवासेना जिल्हाप्रमुख रविंद्र वाकळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख आशा निंबळकर, विधानसभा संपर्क प्रमुख संजय खंडागळे, शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दूतारे, तालुका संघटक सुरेश देशमुख, युवासेना तालुका प्रमुख निलेश गोरे व शिवसैनिकांनी अभिनंदन केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply