Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

अकोले तालुक्यातील 45 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

सरपंच पदासाठी थेट जनतेतून मतदान

अकोले । वीरभूमी- Aug 13, 2022 • 05:49 AM 1741 views
अकोले तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतच्या सदस्य व थेट सरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज घोषित करण्यात आला आहे.

अकोले तालुक्यातील राजूर, सातेवाडी, खिरविरे, समशेरपूर, टाहाकारी, विठे, वारंघुशी, पाडाळणे, जामगाव, मुथाळणे, सावरगाव पाट या राजकीय दृष्ट्या जागृत असणाऱ्या मोठ्या ग्रामपंचायतींसह बहुतांशी आदिवासी ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तालुक्यातील आबीतखिंड, बाभूळवंडी, चिचोंडी, चिंचावणे, धामनवन, गोंदूशी, करंडी, गुहिरे, जामगाव, कातळापूर, केळी- कोतुळ, केळी -ओतूर,केळी-रूम्हणवाडी, खिरविरे,केळुंगण,खुंटेवाडी,कोदणी,लव्हाळी-ओतूर,माळेगाव, मान्हेरे, मवेशी, मुथाळणे, पाडाळणे, पाडोशी, पांजरे,

पळसुंदे, राजूर, पिंपरकणे, सांगवी, रणद खुर्द व बुद्रुक , समशेरपूर, सातेवाडी, सावरगाव पाट, सावरकुटे, शेलद, शेणीत, शिरपुंजे बुद्रुक, टाहाकारी, तळे, तेरुंगण, टिटवी, उडदावणे, विठे, वाकी, वारंघुशी या ४५ ग्रामपंचायत साठी निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. अशी माहिती तहसीलदार सतिश थेटे व निवासी नायब तहसीलदार ठकाजी महाले यांनी दिली.

घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार १८ ऑगस्ट २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे २४ ऑगस्ट २०२२ ते १ सप्टेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे २७, २८ व ३१ ऑगस्ट २०२२ रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत.

नामनिर्देशनपत्रांची छाननी २ सप्टेंबर २०२२ रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. मतदान १८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी १९ सप्टेंबर २०२२ रोजी होईल.

समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply