Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

सभासदत्व मिळण्यासाठी शेतकर्‍यांचे उपोषण

नागवडे कारखान्याने पंधरा दिवसात 7326 शेतकर्‍यांना सभासद करून घ्यावे ः प्रादेशिक साखर सहसंचालक

श्रीगोंदा । वीरभूमी - Sep 22, 2022 • 10:50 PM 685 views
सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे साखर कारखान्याने एप्रिल 2021 मध्ये 7326 शेतकर्‍यांकडून सभासद होण्यासाठी प्रत्येकी भाग भांडवल व प्रवेश फी, म्हणुन 10 हजार 100 रूपये भरुन घेतली होती. गेल्या 16 महिन्यांपासून अद्यापी त्या सर्व शेतकर्‍यांना सभासदत्व मिळाले नव्हते.

या शेतकर्‍यांना नूतन सभासदत्व मिळवून देण्यासाठी श्रीगोंदा-शिरूर तालुक्यातील भाऊसाहेब पवार, प्रशांत मगर, अभिषेक गिरमकर, सोमनाथ जाधव, रविंद्र मचाले, सिद्धेश्वर नांद्रे, सुनील जाधव, श्रीकांत मगर, महेश पवार, अनंत पवार व इतर शेतकर्‍यांनी गुरूवार दि.22 रोजी अहमदनगर येथील प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयापुढे आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते. प्रादेशिक सह संचालक मिलिंद भालेराव यांनी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना लेखी आदेश दिल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले.

उपोषण आंदोलनामुळे नागवडे कारखाना प्रशासन खडबडून जागे झाले. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 22 (2) नुसार सर्व शेतकरी मानीव सभासद झाले आहेत. त्यानुसार मानवी सभासदांची सहकार कायदा नियम उपविधीनुसार कारखान्याने पात्र व्यक्तींची नावे ‘आय’ व ‘जे’ नोंदवहीत समाविष्ट करून सभासदांना सभासद क्रमांक व भाग दाखले पंधरा दिवसात देण्याचे लेखी आदेश प्रादेशिक सहसंचालक मिलिंद भालेराव यांनी कारखाना प्रशासनास दिले.

नूतन सभासदत्व मिळण्यासाठी शेतकर्‍यांनी जमा झालेल्या भाग भांडवल व प्रवेश प्रवेश फीची एकूण रक्कम 7 कोटी 51 लाख जमा केली आहे. या रकमेचे साधारणपणे 37 लाख रुपये व्याजाच्या रकमेच्या चौकशीची मागणी आंदोनकर्त्यांनी केली आहे.

यावेळी बोलताना उपोषणकर्ते भाऊसाहेब पवार म्हणाले की, लेखी आदेश हा सर्वसामान्य कष्टकरी शेतकर्‍यांचा विजय आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कारखाना प्रशासनाने तात्काळ करावी.

उपोषणाला कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशवराव मगर, जिजाबापू शिंदे, संदीप नागवडे, जितेंद्र मगर, बाळासाहेब मगर, रफिक इनामदार, बाळासाहेब पवार, किरण कुरुमकर, मदन मगर, खिवराज मचाले, अंकुश नवले व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply