Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

अपहरण झालेल्या तरुणाची सुटका

शेवगाव पोलिसांची दमदार कामगिरी । पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या

शेवगाव । वीरभूमी- Sep 24, 2022 • 02:56 PM 5219 views
शेवगाव तालुक्यातील शेकटे बु. येथील सोनाजी छबुराव बोरुडे (वय 30 वर्षे) या तरुणाचे गुरुवार दि. 22 रोजी बालमटाकळी येथील साई कोटक जिनिंग जवळून चार ते पाच जणांनी अपहरण केले होते. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आत शेवगाव पोलिस ठाण्याचे पोनि. विलास पुजारी यांनी पाच अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळून अपहरण झालेल्या तरुणाची सुटका केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील शेकटे बु. येथील तरुण सोनाजी छबुराव बोरुडे (वय 30 वर्षे) या तरुणाचे चार ते पाच जणांनी गुरुवार दि. 22 रोजी शेवगाव-गोवराई रोडवरील बालमटाकळी शिवारातील साई कोटेक जिनिंग जवळून बोलेरो जीपमधून अपहरण केले होते. याबाबत अपहरणकर्त्याचा पुतण्या लक्ष्मण भीमराव बोरुडे यांच्या फिर्यादीवरुन शेवगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभिर्य लक्षात घेत पोनि. विलास पुजारी यांनी तात्काळ सपोनि. आशिष शेळके यांच्या नेतृत्वाखाली सफौ. बडधे, चापोना. संभाजी धायतडक, पोकॉ. राजेंद्र ढाकणे, पोकॉ. वासुदेव डमाळे यांचे पथक तयार करुन अपहरण झालेल्या तरुणाच्या शोधासाठी पाठविण्यात आले.

या पथकाने सुरुवातीला गेवराई (जि. बीड) येथे शोध घेतला मात्र अपहरणकर्त्यांचा शोध लागला नाही. यानंतर दि. 23 रोजी सकाळी 7.30 वाजता सोनाजी बोरुडे याच्या चुलत भावाच्या मोबाईलवर फोन करुन चार ते पाच लाख रुपयाची मागणी केली.

याबाबतची माहिती पोलिसांना कळताच पोलिस पथकाने मोबाईल लोकेशनच्या मदतीने सुरुवातीला जेजूरी, नंतर बारामती पोलिसांच्या मदतीने सापळा लावून भगवान प्रल्हाद ठोसर (वय 36, रा. सिंदखेड, ता. गेवराई), कैलास केरूजी धरंधरे (वय 50, रा. साठेनगर, गेवराई, ता. गेवराई), जीवन प्रकाश करांडे (वय 30, रा. सिंदखेड, ता. गेवराई), बाळासाहेब भास्क़र करांडे (वय 50, रा. मोटे गल्ली, गेवराई, ता. गेवराई), ज्ञानेश्वऱ भगवान कांबळे (वय 27, रा. साठेनगर गेवराई, ता. गेवराई) यांना शिताफिने अटक केली.

अटक केलेल्या पाच जणांच्या तावडीतून अपहरित तरूण सोनाजी छबुराव बोरूडे याची सुटका करत गुन्ह्यात वापरलेली बोलेरो जीप (क्र. एमएच 23, ई 9713) ताब्यात घेतली.

अवघ्या चोवीस तासात अपहर झालेल्या तरुणाची सुटका करत पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्याने पोनि. विलास पुजारी यांच्यासह तपासी पथकाने पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागिय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्यासह नागरिकांमधून कौतूक होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply