Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींचा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

पहा कोणत्या ग्रामपंचायतीची लागणार निवडणूक । दिवाळीनंतर ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता

शेवगाव । वीरभूमी- Oct 06, 2022 • 11:45 PM 5712 views
माहे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्‍या शेवगाव तालुक्यातील 12 व पाथर्डी तालुक्यातील 11 अशा 23 ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक घेणे क्रमप्राप्त आहे. अशा 23 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी राबविण्याचा मतदार यादी कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. 31 मे 2022 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. तर दि. 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी करण्यात येणार आहे. दि. 13 ते 18 ऑक्टोबर या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर हरकती व सुचना दाखल करता येणार आहेत. तर दि. 21 ऑक्टोबर रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीमध्ये शेवगाव तालुक्यातील 12 तर पाथर्डी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामध्ये शेवगाव तालुक्यातील खामगाव, भायगाव, प्रभुवाडगाव, कुरुडगाव/रावतळे, खानापूर, जोहरापूर, रांजणी, दहिगावने, वाघोली, आखेगाव तितर्फा, अमरापूर व सुलतानपूर खुर्द या ग्रामपंचायतीचा मतदार यादी कार्यक्रम जाहीर झाला आहे.

पाथर्डी तालुक्यातील भालगाव, वडगाव, कोळसांगवी, सोनोशी, कोरडगाव, जिरेवाडी, निवडूंगे, मोहरी, वैजुबाभूळगाव, तिसगाव व कोल्हार या ग्रामपंचायतींचा मतदार यादी कार्यक्रम जाहीर झाला आहे.

शेवगाव व पाथर्डी तलुक्यातील मतदार यादी कार्यक्रम जाहीर झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या लोकसंख्येच्या व राजकीयदृष्ट्या महत्वाच्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामुळे वरील गावांमधील राजकीय वातावरण तापणार आहे.

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राबविण्यात येणार्‍या मतदार यादी कार्यक्रमानंतर म्हणजे दिवाळीनंतर वरील ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे अवघ्या काही दिवसात शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील राजकीय वातावरण तापणार आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply