Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पाथर्डीतील भेसळयुक्त दुधावर छापा

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

पाथर्डी । वीरभूमी- Oct 11, 2022 • 08:16 PM 7998 views
शहरातील वीर सावरकर मैदान येथून विवेकानंद दूध संकलन केंद्र यांनी संकलित केलेले 950 लिटर भेसळयुक्त दूध अहमदनगर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे यांनी जप्त करुन नष्ट केले आहे.

सोमवार दि. 10 ऑक्टोबर 2022 रोजी पाथर्डी येथून शेवगाव तालुका दुध संघाच्या जागेतील मे. सनफ्रेश अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि. शेवगाव एम.सी.सी, शेवगाव येथे अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने अचानक करण्यात आलेल्या तपासणीत विक्रीसाठी आलेल्या दूध संकलकांची तपासणी केली असता मे. विवेकानंद दुध संकलन केंद्र, वीर सावरकर मैदान, पाथर्डी, मालक ज्ञानदेव शहादेव घुले यांनी तेथे विक्रीसाठी आणण्यात आलेले 950 लिटर गाय दुध भेसळयुक्त असल्याचे संशयावरुन अन्न व औषध प्रशासनाने अन्न नमुना सदरील दुध घेउन नष्ट केले आहे.

ज्ञानदेव शहादेव घुले हे अत्यंत खराब व आतल्या बाजुस किटन आलेल्या प्लास्टीकच्या कॅन्समध्ये दुध संकलित करुन त्याची विक्री करत असल्याचे आढळून आले. तसेच सदर गाय दुधाची इंडीफॉस मशिनवर चाचणी केली असता त्यात साखरेचे प्रमाण असल्याचे आढळून आले. सदर दुधाची आम्लता ही वाढलेली असल्याचे आढळून आले होते. सदर दुधाचा नमुना विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला असून अहवाल प्राप्त झाल्या नंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

मे.सनफ्रेश एग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि. शेवगाव एमसीसी, शेवगाव या प्लांटचीही सखोल तपासणी करण्यात आलेली असुन तेथे प्रक्रिया करण्यात आलेल्या गाय दुधाचा नमुनाही विश्लेषणासाठी घेण्यात आलेला आहे. सदरची कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे यांनी सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली घेतली आहे.

दूध संकलन केंद्र चालकांनी सकाळी व संध्याकाळी दोन वेळा ताजे दुध स्वच्छ, निटनेटक्या व आरोग्यदायी वातावरणात स्टेनलेस स्टील अथवा अ‍ॅल्युमिनीयम कॅन्समध्ये दुध स्विकारुन संकलना नंतर तीन तासाचे आत शितकरण केंद्रात पोहोच होईल, याची काळजी घ्यावी.

दूध शितकरण केंद्रांनी दूध स्विकारताना सर्व भेसळकारी पदार्थांच्या चाचण्या घेऊनच व्यावसायीकांचे दूध स्विकारावे. तसेच दुध भेसळीसंदर्भात काही माहीती असल्यास अन्न व औषध प्रशासनाश कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहान सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply