Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

नवरात्र उत्सवात मोहटादेवी चरणी सुमारे दोन कोटीचे दान

नवरात्र उत्सवात मोहटादेवी चरणी सुमारे दोन कोटीचे दान

पाथर्डी । वीरभूमी - Oct 14, 2022 • 06:27 PM 4406 views
भाविकांच्या नवसाला पावणारी आई जगदंबा मोहटादेवी जागृत देवस्थान म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहे. श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर संपन्न झालेल्या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये लाखो भाविकांनी देवी दर्शन घेऊन सुमारे २ कोटी रुपयांचे भरभरून दान देवीच्या दानपेटीत अर्पण केले.

देवस्थानचे दानपेट्यामधील सोने चांदीसह रोख रक्कमेची मोजदाद नुकतीच धर्मादाय आयुक्त यांचे प्रतिनिधी डॉ.डी. एस. आंधळे, देवस्थान विश्वस्त, बॅक अधिकारी, पाथर्डी येथील शेवाळे सराफ, व कर्मचारी यांनी पोलीस सुरक्षा व सीसीटीव्ही चे निगराणीमध्ये केली.

यावेळी रोख रक्कम रुपये १ कोटी २७ लाख ६० हजार ५५४, अशुद्ध सोने ४० तोळे अंदाजे मूल्य १६ लाख ६४ हजार , अशुद्ध चांदी वस्तू १३ किलो ८१० ग्रम मूल्य ५ लाख १३ हजार ९९२ मात्र, चांदीचे छत्र व पंचारती मूल्य ३ लाख मात्र, तसेच विविध देणगी पावती ४० लाख २९ हजार ९३०, ऑनलाइन स्वरुपात देणगी ४ लाख ८६ हजार २०३ रुपये प्राप्त झाले.

मुळचे संगमनेर व मुंबई येथील देवीभक्त उद्योजक बाबूराब सांगळे यांनी देवस्थानास सुमारे ३ लाख रुपये किमतीची अद्यावत सी सी टी वी सिस्टम देणगी स्वरुपात अर्पण केली. अशा विविध स्वरुपात रुपये २ कोटींच्यावर उच्चांकी देणगी देवस्थानास प्राप्त झाली. अशी माहिती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली.

नवरात्रोत्सव यशस्वी होणेसाठी अहमदनगर चे प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांचे मार्गदर्शनाखाली देवस्थानचे चेअरमन तथा जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी, पाथर्डीच्या दिवाणी न्यायाधीश तथा विश्वस्त श्रीमती अश्विनी बिराजदार, उपवनसंरक्षक श्रीमती सुवर्णा माने, तहसीलदार श्याम वाडकर, गटविकास अधिकारी डॉ. जगदीश पालवे, विश्वस्त भीमराव पालवे, अशोक विक्रम दहिफळे, अशोक भगवान दहिफळे, आजिनाथ आव्हाड, श्रीमती सरिता दहिफळे, अँड. विजयकुमार वेलदे, अँड. सुभाषराव काकडे, सतीश वैद्य, सुधीर लांडगे, डॉ.ज्ञानेश्वर दराडे यांनी भाविकांना विशेष सुविधा उपलब्ध करून दिली.

चेअरमन सुनील गोसावी यांनी शारदीय नवरात्र महोत्सव शांततेत संपन्न होणे करिता विविध विभागांनी, संस्थांनी केलेल्या सहकार्याबद्दल अधिकारी, कर्मचारी, भाविक भक्त, ग्रामस्थ यांचे आभार व्यक्त केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply