Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

कुख्यात मुल्ला कटर टोळीविरुद्ध मोक्का

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून वेश्याव्यवसायासाठी शेवगावला केली होती विक्री

श्रीरामपूर । वीरभूमी - Oct 15, 2022 • 10:13 AM 2837 views
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन वेश्या व्यवसायासाठी विक्री केल्याप्रकरणी मुल्ला कटर टोळीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यानंतर या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपविभागिय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांनी दिली.

टोळीचा प्रमुख इम्रान युसुफ कुरेशी उर्फ मुल्ला कटर (वय 35, रा. वॉर्ड नंबर 2, श्रीरामपूर) हा असून त्याचे श्रीरामपूर शहरात कायम वास्तव्य आहे. तो आणि टोळीतील इतर सदस्यांनी वेळोवेळी एकत्र येऊन संघटितपणे मालमत्ता विषयक, शरीराविरुद्धचे, महिला अत्याचार संबंधी गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.

मुल्ला कटर हा कोणत्याही प्रकारचा कामधंदा करीत नसून बळाचा वापर करून आर्थिक फायदा मिळविण्याकरिता तो वेळोवेळी त्याचे टोळीतील साथीदारांसह श्रीरामपूर शहर परिसरात अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असतो. त्यामुळे टोळीप्रमुख व टोळी सदस्या विषयी श्रीरामपूर शहर व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केलेले आहे.

श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 2 येथे राहणारी पिडीत हिच्यावर आरोपींनी सामूहिक बलात्कार करून तिला पांढरीपुल येथे टोळी सदस्य बाबा चेंडवाल यास विक्री केली. टोळी सदस्य बाबा चेंडवाल याने तिचेवर बळजबरीने अत्याचार केले व वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. तसेच टोळीप्रमुख मुल्ला कटर, बाबा चेंडवाल, पप्पू उर्फ प्रशांत दादासाहेब गोरे यांनी पीडितेची शेवगाव येथे मिना मुसवत हिच्या कुंटणखाण्यात विक्री केली.

सदर गुन्ह्यात महिला आरोपी सुमन मधुकर पगारे व सचिन मधुकर पगारे यांनी मदत केल्याचे तसेच वेश्याव्यवसाय करून मिळणार्‍या पैशावर उदरनिर्वाह केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्याचे तपासी अधिकारी डीवायएसपी संदीप मिटके यांनी सदर गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम 1999 चे कलम 3 (1), (॥),3(2), 3 (4)प्रमाणे वाढीव कलम लावण्यास मंजुरी मिळणे बाबतचा प्रस्ताव अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या मार्फत नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांना सादर केला होता. या प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिल्याने सदर गुन्ह्यास मोक्का कायद्यान्वये कलमवाढ करून कारवाई करण्यात आली.

सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर पाटील, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली डिवायएसपी संदीप मिटके, पोनि. गवळी, सपोनि. बोरसे, पो. उपनिरिक्षक सुरवडे, मपोना. अश्विनी पवार, पोना. संतोष दरेकर, पोकाँ. रवींद्र माळी, पोकाँ. विलास उकिरडे यांनी केली.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply