Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पारनेरचे नगराध्यक्ष विजय औटी यांचा राजीनामा

पारनेरचे नगराध्यक्ष विजय औटी यांचा राजीनामा

पारनेर । वीरभूमी- Oct 20, 2022 • 06:25 PM 3269 views
पारनेर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष विजय सदाशिव औटी यांनी गुरुवारी आपल्या नगराध्यक्ष पदाचा आणि नगरपंचायतीतील गटनेतेपदाचा राजीनामा नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांकडे लेखी पत्राद्वारे दिला आहे. विजय औटी यांनी अचानक राजीनामा दिल्याने पारनेर शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

विजय औटी यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे, की जेव्हापासून मी पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कारभार हातात घेतला तेव्हापासून माझी व माझ्या कुटुंबाची प्रतिमा मलीन करण्यासाठी कट कारस्थाने रचू लागली. राजकीय वैमनस्यातून मला नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवरून खाली खेचण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू झाले.

अनेक जुनी प्रकरणे काढून माझ्यावर गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न विरोधकांनी केले असून या खोट्या गुन्ह्यांमुळे मी नगराध्यक्ष पदाला वेळ देऊ शकत नाही. नगराध्यक्षपदाची खुर्ची माझ्या कार्यात अडथळा ठरत असेल तर अशा खुर्चीवर मी तुळशीपत्र ठेवून आमदार नीलेश लंके यांचा एक कार्यकर्ता म्हणून व राष्ट्रवादी पक्षाचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून यापुढे काम करणार आहे.

विजय औटी हे नगराध्यक्ष झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यात शासकीय कामात अडथळ्यासह जमीन खरेदीतून फसवणुकीचे पारनेर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे औटी यांना नगराध्यक्ष पदाचे कामकाज करताना अनेक अडीअडचणी येत आहेत.

सदर नगराध्यक्ष पदाच्या कामासाठी त्यांना वेळ देता येत नसल्याने त्यातूनच त्यांनी राजीनामा दिला असेल असे बोलले जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply