Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

आ. राजळेंच्या दिवाळी फराळाला स्नेहीजनांची मांदियाळी

पक्षीय जोडे बाजुला ठेवत अनेकांची हजेरी । महाविद्यालयाचा परीसर गर्दीने फुलला

पाथर्डी । वीरभूमी - Oct 31, 2022 • 11:12 AM 611 views
शेवगाव-पाथर्डी मतदार संघाच्या आ. मोनिकाताई राजळे यांच्यावतीने आयोजित केलेल्या ‘दिवाळी फराळ’ कार्यक्रमाला शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील स्नेहीजनांनी हजेरी लावली. दिवाळी फराळानिमित्त अनेकांनी पक्षीय जोडे बाजुला ठेवत हजेरी लावत राजळे कुटुंबाला शुभेच्छा दिल्या.

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या आ. मोनिकाताई राजळे यांच्यावतीने कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे महाविद्यालयाच्या प्रांगणात कार्यकर्ते, पदाधिकारी, अधिकारी व स्नेहीजनांसाठी ‘दिवाळी फराळा’चे आयोजन करण्यात आले होते. या दिवाळी फराळ स्नेहभोजनासाठी शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील स्नेहीजनांना आमंत्रीत करण्यात आले होते.

या दिवाळी फराळ स्नेहभोजनासाठी अनेकांनी पक्षीय जोडे बाजुला ठेवत आ. राजळे यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत शुभेच्छा दिल्या. दिवाळी फराळ स्नेहभोजनासाठी येणार्‍या स्नेहीजनांचे स्वागत आ. मोनिकाताई राजळे यांच्यासह वृद्धेश्वरचे अध्यक्ष आप्पासाहेब राजळे, माजी जि. प. सदस्य राहुलदादा राजळे यांनी केले.

शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध गावच्या सेवा सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीने दादापाटील राजळे महाविद्यालयाचा परिसर फुलून गेला होता.

या स्नेहभोजनासाठी खा. डॉ. सुजय विखे, आ. शिवाजीराव कर्डिले यांच्यासह रेणुकामाता मल्टिस्टेटचे भालेराव, अरुण आठरे, ज्येष्ठ नेते बापुसाहेब भोसले, माजी सभापती काशिनाथ लवांडे, शिवसेना (ठाकरे गट) पाथर्डी तालुका अध्यक्ष भगवान दराडे, मनसेचे पाथर्डी तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, परिवहन मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे, भाजपा किसान मोर्चाचे बापुसाहेब पाटेकर,

शेवगाव तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, पाथर्डी तालुका अध्यक्ष माणिकराव खेडकर, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, डॉ. मृत्यूंजय गर्जे, बंडू बोरुडे, नंदकुमार शेळके, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कचरु चोथे, भाजपाचे शेवगाव तालुका सरचिटणीस सुनील रासने, नगरसेवक महेश फलके, भिमराज सागडे, चारुदत्त वाघ, धनंजय बडे, सचिन नेहुल, भाजपा महिला आघाडीच्या शेवगाव तालुका अध्यक्षा आशाताई गरड, मंगलताई कोकाटे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply