Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

Cheating on a woman- नवर्‍याचा बाहेरचा नाद सोडविण्यासाठी बुवाबाजी

महिलेची 15 हजार रुपये घेऊन फसवणूक करणार्‍या मांत्रिकावर गुन्हा दाखल

कर्जत । वीरभूमी- Dec 11, 2022 • 02:45 PM 2631 views
नवरा (the husband) काहीच कामधंदा (at work) करत नाही. त्याला बाहेरचा नाद आहे. आपण ते सगळं ठीक करू असे, सांगत भोंदूबाबाने फिर्यादीस जवळची पांढरी पावडर ओवाळून ती पावडर पंधरा दिवस भाजीत टाकून नवर्‍याला खायला दे. यासह ताईत गळ्यात बांध म्हणून पंधरा हजार घेत ठगवले.

मात्र नवर्‍याच्या सवयीत कसलाच फरक न पडल्याने शेवटी त्या महिलेने कर्जत (Karjat) पोलीस (Police) ठाण्यात मांत्रिक (wizard) नवनाथ साहेबराव मांडगे यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक (Anti-witchcraft) कायद्यानुसार गुन्हा दाखल (Filed a case) केला आहे.

कर्जत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जत तालुक्यातील महिलेची मुलगी पतीसह पुणे येथे राहते. तिचा पती काही कामधंदा करत नसल्याने व त्रास देत असल्याचे फिर्यादीने शेजारी राहत असलेल्या महिलेला सांगितले. शेजारील महिलेने ओळखीच्या जळकेवाडी येथील नवनाथ मांडगे या मांत्रिकाला तिच्या घरी बोलावले.

त्यानंतर महिलेस व तिच्या मुलीला समोर बसवुन त्यांच्या समोरच पाट मांडून त्यावर गहू ठेऊन, अगरबत्ती लावून त्यावर ठेवलेला गव्हाचा एक-एक दाणा बाजूला काढून व गव्हाचे दाणे मोजून ‘बाई तुझे सर्व खरे आहे. तुझा नवरा काहीही कामधंदा करत नाही. त्याला बाहेरचे नाद आहेत असे म्हणून त्याने पांढरी पावडरची पुडी अगरबत्ती पाटासमोर ओवाळून ही पुडी पंधरा दिवस नवर्‍याला भाजीतून खाऊ घाल, तुझा नवरा व्यवस्थित होऊन तू म्हणशील तसे तुझे ऐकेल असे सांगितले.

त्यानंतर पुडीसह तीन ताईत मुलगी व घरातील बायांच्या गळ्यात बांधण्यास दिले. आणि त्यांच्याकडून 15 हजार उकळले. तदनंतर मला 1 हजार रुपये दे असे म्हणाला. काही दिवसांनी लोणी मसदपूर येथे मांत्रिकाची भेट होताच तो राहिलेले हजार रुपये फिर्यादीला मागत होता.

त्यानंतर पंधरा दिवसांनी फिर्यादीच्या मुलीस पावडर खायला घातली का? असे विचारले असता. महिलेने ’सगळी पावडर खायला घातली व ताईतही बांधले पण काहीही फरक पडला नाही’ असे तिने सांगिलते. आपली फसवणूक झाली आहे, अशी खात्री होताच आणि पुन्हा पैसे मागत असल्याने फिर्यादी महिलेने कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना सदरचा प्रकार सांगितला.

त्या अनुसार कर्जत पोलिसांनी मांत्रिकावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम 2013 कलम 3 नुसार गुन्हा दाखल केला. सदर घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पांडुरंग भांडवलकर आणि राजेश थोरात हे करीत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply