Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

शेवगाव राष्ट्रवादीकडून सरकारच्या दडपशाहीचा निषेध

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी

शेवगाव । वीरभूमी- Dec 23, 2022 • 12:23 PM 997 views

राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारने दडपशाहीचे राजकारण करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे निलंबन केले. हे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी करत शेवगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेच्यावतीने शिंदे-फडणवीस सरकारचा निषेध केला.

याबाबत शेवगावचे तहसीलदार छगन वाघ यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ‘सभागृहात लोकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात यावी’ अशी मागणी केली. मात्र सत्ताधारी पक्षांचे आमदार यांनी विधानसभेच्या कामकाजात दिशा सालीयानच्या विषयावर बोलत होते.

मात्र सत्ताधारी पक्षाचे 14 लोकप्रतिनिधी या विषावर बोलत होते. तर विरोधी पक्षांकडून एकाच लोकप्रतिनिधीला बोलू दिले जात नाही, हा विरोधी पक्षावर अन्याय आहे. सत्ताधारी पक्ष सत्तेत असतांनाही विधानसभेत आंदोलन करतात. यासाठी विधानसभेचे कामकाज 5 वेळा तहकुब केले गेले. या सरकारच्या कामकाजाविरोधात माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी आवाज उठवला. त्यांनी कुठलाही असंसदीय शब्द वापरला नाही.

परंतू केवळ द्वेषापोटी या हुकुमशाही शिंदे-फडणवीस सरकारने जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. जयंत पाटील यांच्यावरील कारवाई तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी करत शिंदे-फडणवीस सरकारच्या दडपशाहीचा शेवगाव राष्ट्रवादीकडून निषेध करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नेते काकासाहेब नरवडे, अरूण पा. लांडे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलासराव नेमाणे, युवक तालुकाध्यक्ष ताहेर पटेल, शहरध्यक्ष कमलेश लांडगे, नानापाटील मडके, प्रदीप काळे, कैलास तिजोरे, संतोष जाधव, वाहाब शेख, समिर शेख, तुफैल मुलानी, महेश दातीर, संकेत वांढेकर, गोविंद किंडमिचे, अशफाक पठाण, गणेश साळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply