Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ अकोल्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवा जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ अकोल्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवा

खुल्या बाजारात विक्रीसाठी जाणार रेशनचा तांदूळ पकडला

शेवगाव पोलिसांची कामगिरी । 40 टन तांदूळासह 53 लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात

शेवगाव । वीरभूमी - Dec 24, 2022 • 10:51 PM 5743 views

खुल्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा तांदूळ पोलिसांनी पकडला. हा तांदूळ एका ट्रकमधून नेला जात होता. तर काही तांदूळ एका घरामध्ये साठवणूक करुन ठेवलेला होता.

शेवगाव पोलिसांनी ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्री केली. यामध्ये तब्बल 40 टन तांदुळासह एकुण 53 लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव शहरातून नेवासा रोडने एका ट्रक मधून रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती गुप्त खबर्‍या मार्फत शेवगावचे पोनि. विलास पुजारी यांना समजली. या माहितीची खातरजमा करुन सपोनि. रविंद्र बागुल, सपोनि. विश्वास पावरा, सपोनि. शेळके यांच्यासह पोहेका. बाबासाहेब शेळके, पोना. प्रवीण बागुल, सोमनाथ घुगे, अशोक लिपणे, संतोष काकडे, पोकॉ. अमोल ढाळे, महिला पोलिस शितल गुंजाळ यांच्या पथकाने शेवगाव - नेवासा रोडवरून रेशनचा तांदूळ घेऊन जाणारा ट्रक (क्र. एमएच 16, सीडी 7180) पकडला.

ट्रकमध्ये रेशनचा तांदूळ असल्याने शासकीय पंचाना बोलावून पंचनामा करुन सदरचा ट्रक पोलिस ठाण्यात आणला. दरम्यान ट्रक चालकाकडे अधिक चौकशी केली असता रेणुकानगर येथील भिमा मारुती गायकवाड याचे घरात स्वस्त धान्य दुकानाचा शासकिय तांदुळ साठा करुन ठेवलेला होता, असे सांगितले. यावरुन पोलिसांनी सदरील ठिकाणी छापा टाकला असता दोन खोल्यामध्ये स्वस्त धान्याचा शासकीय तांदुळाचा साठा मिळून आला. 

तेथे पोलिस गार्डची नेमणूक करुन नायब तहसीलदार राहुल पोपट गुरव व पुरवठा अधिकारी श्री. चव्हाण यांनी तांदूळाचे मोजमाप करुन पंचनामा केला. यामध्ये अंदाजे 9 लाख रुपये किंमतीचा 40 टन रेशनचा तांदूळ, 44 लाख रुपये किंमतीचा ट्रक असा तब्बल 53 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

स्वस्त धान्य शासकीय तांदुळाची चोरटी वाहतूक करुन चढ्या भावाने बाजारात विक्री करण्यासाठी इतर जिल्ह्यात व आंतर राज्यात सदरचा तांदूळ विक्री होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. यामध्ये कोणकोणते व्यापारी, दुकानदार व व्यावसायिक सहभागी होते, याबाबत पोलिस माहिती घेत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply