Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

‘काष्टीकरांची तर्‍हाच न्यारी... 25 लाख लय लय भारी’

काष्टीतील 25 लाखांच्या मटक्याचा नादच खुळा... चर्चांना उधाण

विजय उंडे । वीरभूमी - Dec 31, 2022 • 08:47 AM 1647 views

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीचा धुरळा खाली पडतो न पडतो तोच उपसरपंचपदाची निवडणूक झाली. एकीकडे उपसरपंचपदाची निवडणूक चालू असताना दुसरीकडे एका जणाला 25 लाखांचा मटका लागला.

गाव कारभारी निवडणूक राहिली बाजुला मात्र जास्त चर्चा अचानक लागलेल्या मटक्याच्या आकड्याचीच चौकाचौकात चर्चिली जाऊ लागली. 

या मटक्याचे झाले असे की, शासनाने मटक्यावर बंदी घातल्याने तो चोरून खेळला जातो. अनेक वर्षांपासून काष्टीत मटका बंद होता. मात्र चंगळवादी माणसांच्या हव्यासापोटी मटका काल परवाच सुरू झाला. गुपचुप खेळल्या गेलेल्या या मटक्यामध्ये एक जणाला चक्क 25 लाखांचा मटका लागला.

मटका लागलेला बहाद्दर गडी त्याने शेवटपर्यंत 25 लाखांच्या आकड्याचा मागमूस मित्र मंडळीना लागू दिला नाही.  या मटक्याची चर्चा क्षणार्धात गावभर पसरली. लागलीच काष्टी येथील झिरो पोलिस सावध झाले. मटका कोठे खेळला गेला? तो कोणाला लागला? याचा ते क्षणार्धात शोध घेऊ लागले. संपूर्ण गाव या झिरो पोलिसांनी धुंडाळले.

गावात थांगपत्ता न लागल्याने वाड्या-वस्त्यांवर शोध घेण्याचा प्रयत्न झाला. आकडा 25 लाखांचा लागला मात्र माणूस शोधता सापडेना!! बिच्चारे झिरो पोलिस दमून गेले. पर्यायी त्यांनी त्यांचे खाजगी श्वानपथक कामाला लावले. मटका लागलेला माणूस आहे तरी कोण? याबद्दल सगळ्याच गावात कुतूहल निर्माण झाले.  काही केल्या गावातील नागरिकांचे समाधान होता होईना.

शेवटी खाजगी श्वानपथक एका घराजवळ जायचे अन् परत पाठीमागे यायचे. श्वानपथकाच्या या वागण्याने झिरो पोलिसही चक्रावले. त्यांनी स्वतःच शोध घेण्याचे ठरविले.

श्वानपथक ज्या घरी जायचे त्या घराकडे झिरो पोलिसांनी आपला मोर्चा वळवला. मात्र ते घर पाहून झिरो पोलिस अचंबित झाले. मटका लागलेले घर झिरो पोलिसांच्या नात्यातलेच निघाल्याने त्यांनी तेथून काढता पाय घेतला.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply