Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

‘आनंदवन’ मधील वृक्षांना ठिबक सिंचनाने नवसंजीवनी

आ. मोनिकाताई राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त कासार पिंपळगाव येथील राजीव राजळे मित्र मंडळाचा उपक्रम

 पाथर्डी । वीरभूमी - Feb 21, 2023 • 10:28 AM 911 views

शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथे जोपासलेल्या ‘आनंदवन’ येथील वृक्षांना कायम स्वरुपी आवश्यक ते पाणी मिळण्यासाठी कासार पिंपळगाव येथील मा. आ. स्व. राजीव राजळे मित्र मंडळाच्यावतीने ठिबक सिंचन बसविण्यात आले. या ठिबक सिंचनाने ‘आनंदवन’ येथील वृक्षांना नवसंजीवनी मिळाली आहे.

ठिबक सिंचन संचाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य राहुलदादा राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील ‘आनंदवन’ या ठिकाणी राजीव स्मृति उद्यानाची उभारणी करण्यात आली.

येथे  संदीप राठोड यांनी वृक्ष लागवडीचा महिमा जोपासलेला  आहे. हे पुढे सुरु ठेवत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 5 जून 2022 रोजी शेवगाव-पाथर्डीच्या आ. मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व राजीव स्मृति उद्यान याची उभारणी झाली. या ठिकाणी वृक्षारोपणाने नवीन जंगल उभा करण्याची तयारी सुरू झाली. परंतु उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागल्याने त्या ठिकाणी वृक्ष संवर्धनासाठी पाणी टँकरची गरज भासू लागली.

मागीवर्षीच्या उन्हाळ्यामध्ये येथे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता. यामुळे येथे नुकतीच लागवड केलेली वृक्षसंपदा पाण्याअभावी जळून जाईल की काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आ. मोनिकाताई राजळे यांच्या माध्यमातून वनविभागाच्या परवानगीने ‘आनंदवन’ या ठिकाणी बोअरवेल घेण्यात येवून झाडांना पाणी देण्यास प्रारंभ झाला.

 परंतु या उन्हाळ्यात झाडांना पाणी कमी पडू नये म्हणून ठिबक सिंचन योजना असेल तर कमी पाणीही झाडांना मुबलक प्रमाणात देता येईल. असा विचार समोर आला. उन्हाळ्यात निर्माण होणार असलेली पाणीटंचाई जाणवू नये म्हणुन कासार पिंपळगाव येथील मा. आ. स्व. राजीव राजळे मित्र मंडळाच्यावतीने ‘आनंदवन’ या ठिकाणी ठिबक सिंचन संच बसविण्याचा निर्णय झाला.

या निर्णयानुसार शेवगाव-पाथर्डीच्या आ. मोनिकाताई राजळे यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र मंडळाच्यावतीने ठिबक सिंचन संच बसविण्यात आला.  याचे उद्घाटन जि. प. सदस्य राहुलदादा राजळे यांच्या हस्ते करण्यात आले. ठिबक सिंचनमुळे ‘आनंदवन’ येथील वृक्षांना नवसंजीवनी मिळाली आहे. 

ठिबक सिंचन उद्घाटन प्रसंगी ग्रा.पं. सदस्य अंकुशदादा राजळे, ग्रा. पं. सदस्य आप्पासाहेब राजळे, प्रा. गंगाधर लवांडे, माजी सरपंच सचिन नेहुल, प्रा. काळोख, प्रविणकुमार तुपे, कांबळे सर, संदीप राठोड, रामेश्वर राजळे, रमेश भुसारी, अमित भगत, भिमराज राजळे, सुभाष शिंदे, गोविंद दगडखैर आदीसह मा. आ. स्व. राजीव राजळे मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply