Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

पाथर्डीत सराफावर खुनी हल्ला

दुकान बंद करुन घरी जातांना घडली घटना

 पाथर्डी । वीरभूमी - Feb 23, 2023 • 10:31 PM 4939 views

पाथर्डी शहरातील नवी पेठेतील सोने-चांदीचे व्यापारी बंडूशेठ चिंतामणी नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन घरी जात असतांना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर खुनी  हल्ला केला. या हल्ल्यात सराफा व्यापारी राजेंद्र उर्फ बंडूशेठ चिंतामणी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करुन पुढील उपचारासाठी नगर येथे पाठविले आहे.

ही घटना गुरुवारी रात्री 7.45 वाजेच्या दरम्यान पाथर्डी शहरातील नवीन बसस्थानक परिसरात घडली. या घटनेने शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून गुन्हेगारांवर कायद्याची जरब नसल्याचे समोर आले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी शहरातील नवी पेठेत राजेंद्र उर्फ बंडूशेठ चिंतामणी यांचे सोने-चांदीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या दरम्यान दुकान बंद करुन ते आनंदनगर येथे घरी जात असतांना त्यांच्यावर अज्ञात चोरट्यांनी खुनी हल्ला केला. चिंतामणी यांच्यावर हल्ला करुन हल्लेखोर पसार झाले.

या हल्ल्यात चिंतामणी हे गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत पाथर्डी उपजिल्हा रुग्णांलयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आले. हल्लेखोरांनी त्यांच्या हातातील पिशवी हिसकावली असल्याचा संशय आहे.

यामुळे या घटनेमध्ये रोख रक्कम व सोन्या - चांदीचा किती ऐवज चोरीला गेला हे चिंतामणी यांच्या जबाबानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेने पाथर्डी शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने पाथर्डी शहरासह तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरासह तालुक्यात अवैध धंदे, लुटमार, चोरी, दुचाकी चोरी अशा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून हे रोखण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरत आहे. राजेंद्र उर्फ बंडूशेठ चिंतामणी यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

या घटनेच्या निषेधार्थ उद्या शुक्रवार दि. 24 रोजी पाथर्डी शहरात बंद पाळण्यात येणार आहे. या घटनेची सखोल चौकशी करुन गुन्हेगारांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply