Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

अमरापूर येथे संतप्त शेतकर्‍यांचा रास्तारोको

अतिवृष्टीच्या अनुदानासह विविध मागण्यांसाठी आंदोलन । मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

शेवगाव । वीरभूमी - Feb 25, 2023 • 01:08 AM 871 views

राज्य शासन फक्त घोषणाबाजी करत असून शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची मदत करत नाही. अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईचे फक्त आकडे सांगितले जातात, मात्र शेतकर्‍यांच्या खात्यावर अद्याप एक रुपयाही मिळाला नाही. अतिवृष्टीचे अनुदान तातडीने द्यावे तसेच शेतीमालाला योग्य भाव द्यावा यासह इतर मागण्यांसाठी शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथे संतप्त शेतकर्‍यांनी रास्तारोको आंदोलन केले. येत्या 15 दिवसात याची अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला.

या आंदोलनात शेतकरी मंडळाचे शिवराज कापरे, मळेगावचे माजी सरपंच चंद्रकांत निकम, अमरापुरचे माजी सरपंच विजय पोटफोडे, चेअरमन बाळासाहेब पोटफोडे, सचिन खैरे, सुभाष अडसरे, सुधाकर पोटफोडे, दिलीप पोटफोडे आदी शेतकरी सहभागी झाले होते.

गत वर्षी तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त पिकांसाठी शासनाने अनुदान मंजुर करुनही अद्याप ते शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात आले नाही. तसेच यंदाही हवामानाच्या बदलाने खरीप व रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. तरीही महसूल प्रशासनाने रब्बीची नजर आणेवारी 75 पैसे जाहीर करुन प्रशासनाने शेतकर्‍यांवर अन्याय केला आहे. आता अंतिम आणेवारी 50 पैशाच्या आत लावण्याची मागणी केली आहे.

तसेच कपाशीला 11 हजार रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा, अतिवृष्टीचे अनुदान त्वरीत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे, रब्बीची अंतिम आणेवारी पन्नास पैशाच्या आत जाहीर करावी, सन 2022 -23 मधील खरीप पिक विमा मिळावा, नियमीत कर्ज फेड करणार्‍या शेतकर्‍यांचे 50 हजार रुपये अनुदान मिळावे, शेतकर्‍यांसाठी असलेली सौरपंप योजना कृषी खात्यामार्फत ऑफलाईन करण्यात यावी अशा मागण्यांसाठी शुक्रवारी सकाळी अमरापुर येथील मुख्य चौकात  रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

सुमारे तासभर चाललेल्या या आंदोलनात परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली. तहसील कार्यालयाचे महसुल लिपीक संतोष गर्जे यांनी निवेदन स्विकारल्या नंतर आंदोलन स्थगीत करण्यात आले. पोनि. विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply