Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

ट्रॅक्टर चोरणारे दोघे आरोपी जेरबंद

शेवगाव पोलिसांची दमदार कारवाई । 8 लाखांचे दोन ट्रॅक्टरसह मुद्देमाल जप्त

 शेवगाव । वीरभूमी - Mar 03, 2023 • 11:23 AM 6121 views

शेवगाव तालुक्यातील अमरापूर व नेवासा तालुक्यातील देडगाव येथून ट्रॅक्टर चोरी गेल्याची शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हाचा शेवगाव पोलिसांनी तपास करत दोन ट्रॅक्टरसह दोघे आरोपी जेरबंद करत 8 लाखांचे दोन ट्रॅक्टर हस्तगत केले आहेत. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.

अटक केलेले आरोपी पाथर्डी तालुक्यातील हत्राळ येथील आहेत. या आरोपींची नावे राजेंद्र बाबासाहेब पटारे व कालिदास दत्तात्रय टकले अशी आहेत.

अमरापूर येथील अरुण भगवान बोरुडे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गु.र.नं.208/2023 भा.दं.वि. कलम 379 प्रमाणे तसेच देडगाव (ता. नेवासा) येथील संदिप गंगाधर चेडे यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन  गु.र.नं.209/2023 भा.दं.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रमाणे सलग दोन गुन्हे दाखल झाल्याने पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांचे मार्गदशनाखाली पोनि. विलास पुजारी यांनी सपोनि. विश्वास पावरा व सपोनि. रविंद्र बागुल यांचे दोन विषेश पथके तयार करुन चोरीच्या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले.

याबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहीती काढुन शेवगाव पोलिसांनी आरोपी राजेंद्र बाबासाहेब पटारे (रा. हत्राळ, ता. पाथर्डी) यास आखेगाव चौक, आखेगाव या ठिकाणी सापळा लावुन ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने साथीदार कालीदास दत्तात्रय टकले (रा. हत्राळ, ता. पाथर्डी) याचेसह दोन्ही ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी कडुन दोन गुन्हयातील चोरीतील 8 लाख रुपये किंमतीचे दोन ट्रॅक्टर असा मुद्देमाल हस्तगत करत दोघा आरोपींना जेरबंद केले आहे.

सदरची कामगिरी पोनि. विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकातील सपोनि. रविंद्र बागुल, सपोनि. विश्वास पावरा, पोहेकॉ. बाबासाहेब शेळके, पोहेकॉ. नेताजी मरकड, पोहेकॉ. परशुराम नाकाडे, पोना. भनाजी काळोखे, पोकॉ. शिरसाठ, पोकॉ. अमोल ढाळे, पोकॉ. संपत खेडकर, पोकॉ. राजेंद्र ढाकणे, पोकॉ. अस्लम शेख, पोकॉ. बप्पासाहेब धाकतोडे, चापोहेकॉ. मन्याळ, चापोना. रविंद्र शेळके, पोना. सोमनाथ घुगे, पोना. संभाजी घायतडक यांच्या पथकाने केली.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply