Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

पाच वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला

कोपर्डी येथील घटना । कर्जत तालुका प्रशासनाकडून बचावकार्य युद्धपातळीवर

कर्जत । वीरभूमी- Mar 13, 2023 • 10:43 PM 3313 views

सोमवारी संध्याकाळी कोपर्डी (ता.कर्जत) येथील शेतातील बोअरवेलमध्ये ऊसतोड कामगारांचा पाच वर्षांचा मुलगा पडला असून त्याला वाचविण्यासाठी युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे. सदरच्या परिस्थितीवर तालुका प्रशासन लक्ष ठेवून आहे. घटनास्थळी प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश गावित तळ ठोकून आहेत. 

पोलीस सूत्राकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून, कोपर्डी (ता.कर्जत) येथील संदीप ज्ञानदेव सुद्रीक यांच्या गट नंबर 148 मधील उसाच्या शेतात ऊसतोड करणार्‍या कामगारांचा पाच वर्षाचा मुलगा सागर बुधा बरेला (रा.चिडीयापुरा ता बर्‍हाणपूर मध्यप्रदेश) हा सोमवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास बोअरमध्ये पडला.

तो बोअरच्या 15 फूट खोलीवर असल्याचे जाणवत असून त्याला वाचविण्यासाठी समांतर दोन जेसीबीच्या साह्याने खोदकाम सुरू आहे. यासह त्यास ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी प्राणवायूची नलिका बोअरमध्ये सोडण्यात आली आहे. सदरच्या घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश गावित यांच्यासह पोलीस कर्मचारी श्याम जाधव, गोवर्धन कदम, राहुल खरात आणि जितेंद्र सरोदे यांनी कोपर्डी गाठत युद्धपातळीवर ग्रामस्थांच्या साह्याने मदतकार्य हाती घेतले.

घटनास्थळी कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपजिल्हा रुग्णालयाची टीम, कर्जत नगरपंचायत अग्निशामक दल यांच्यासह महसुल प्रशासन आणि गटविकास अधिकारी तळ ठोकून आहेत. मुलांच्या कुटुंबियांसह, तालुका प्रशासन, कोपर्डी ग्रामस्थ देखील बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. तो सुखरूप बाहेर यावा यासाठी ग्रामस्थ देखील साकडे घातले आहे. जामखेड येथील रिस्क्यू टीमला देखील पाचारण करण्यात आले असल्याचे समजते.

कुरुक्षेत्रच्या प्रिन्सची आठवण ताजी

दि. 21 जुलै 2006 साली कुरुक्षेत्र- हरियाणा येथील पाच वर्षाचाच प्रिन्स असाच 60 फूट खोलीवर बोअरवेल मध्ये पडला होता. त्यास भारतीय जवानांनी तब्बल 49 तासांच्या अथक प्रयत्नाच्या बचाव कार्यानंतर सुखरूप बाहेर काढला होता. त्याच्या सुरक्षिततेसाठी भारतदेशात अनेकांनी पार्थना केली होती. सागरच्या सुरक्षिततेसाठी देखील त्याच्या कुटूंबियांसह कोपर्डी आणि परिसरातील ग्रामस्थ आणि महिला परमेश्वरास साकडे घालत आहेत. 

कुठल्याही परिस्थितीमध्ये मुलाचा जीव वाचला पाहिजे ः आ. प्रा. राम शिंदे
कोपर्डी येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाची माहिती आ. प्रा. राम शिंदे यांना मिळताच त्यांनी तात्काळ कर्जतचे प्रभारी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना भ्रमणध्वनी करीत मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. तसेच त्या मुलांचा जीव कोणत्याही परिस्थितीमध्ये वाचलाच पाहिजे असे सांगितले. रात्री 10:30 च्या दरम्यान पुण्याची एनडीआरएफची टीम कोपर्डीत दाखल झाली असल्याची माहिती तहसीलदार नाईकवाडे यांनी राम शिंदेना दिली. 

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply