Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

मढी देवस्थान व तुकाराम मंदीरासाठी 5 कोटींचा निधी

आ. मोनिकाताई राजळे यांची माहिती

पाथर्डी । वीरभूमी - Apr 02, 2023 • 12:57 PM 863 views

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन  विकास विभाग अंतर्गत प्रादेशिक पर्यटन  विकास योजना सन  2022-23 अंतर्गत पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी परिसराचे श्रध्दास्थान  असणार्‍या संत तुकाराम महाराज मंदीर, माणिकदौंडी येथील विविध विकास कामांसाठी 1 कोटी 60 लक्ष रुपयांच्या तसेच कानिफनाथ देवस्थान मढी येथील मढी ते तिसगांव रस्त्याच्या कामासाठी 3 कोटी 40 लक्ष रुपये मंजूर झाल्याची माहिती आ. मोनिका राजळे यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहीती अशी की, माणिकदौंडी, ता. पाथर्डी या दुर्गम भागातील परिसरातील नागरीकांचे श्रध्दास्थान असलेल्या संत तुकाराम महाराज मंदीर परिसराच्या विकास कामांसाठी शासनाचा निधी मिळावा, यासाठी माणिकदौंडी व परिसरातील नागरीकांची सातत्याने मागणी होती. त्यामुळे आ. मोनिका राजळे यांनी शासनाच्या पर्यटन  विकास विभागाकडे पाठपुरावा केला.

त्याला यश येवून  संत तुकाराम महाराज मंदीर परिसरातील भक्त निवास बांधकाम, मंदीर परिसरात वॉल कंपाऊड, मंदीर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, सिडीवर्क व कॉक्रीट रस्ता, परिसर सपाटीकरण इत्यादी कामांसाठी 1 कोटी 60 लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला, तसेच नाथ सांप्रदायात अत्यंत महत्वाचे स्थान  असणारे श्री कानिफनाथ मंदीर मढी येथून  तिसगांवकडे जाणार्‍या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण होण्यासाठी, परिसरातील नागरीक, भाविक भक्त व मढी देवस्थान ट्रस्ट यांनी हा रस्ता होणेसाठी वारंवार मागणी केली होती.

पर्यटन  विकास विभागाअंतर्गतच मढी - तिसगांव रस्त्यासाठी 3कोटी 40 लक्ष  रुपयाच्या कामास मंजूरी मिळाली आहे. यासाठीचा शासन  निर्णय क्र. टिडीसी 2023/03/प्र.क्र. 120 / पर्यटन 29 मार्च व शासन  निर्णय क्रमांक - टीडीसी 2023/03/प्रक्र 150/ पर्यटन  31 मार्च 2023 नुसार निधी प्राप्त होणार आहे. या दोन्ही तिर्थक्षेत्रांना  परिसर विकासासाठी निधी दिल्याबद्दल पर्यटन  मंत्री मंगलप्रभात लोढा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांचे आमदार मोनिका राजळे यांनी आभार मानले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply