Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

झोपलेल्या दोन बालकांना टेम्पोने चिरडले

शेवगाव येथील जिनिंगमधील दुदैवी घटना

 शेवगाव । वीरभूमी - Apr 17, 2023 • 03:22 PM 6261 views

तळणी शिवारातील एका जिनिंगमध्ये झोपलेल्या दोन बालकांचा टेम्पोच्या चाकाखाली चिरडून मृत्यू दुदैवी घटना आज सोमवारी सकाळी 6 ते 6.30 वाजेच्या दरम्यान घडली. सचिन लालसिंग मेवाड (वय 3 वर्षे), कार्तिक लालसिंग मेवाड (वय 2 वर्षे, दोघे रा. ताराबापडी, ता. भगवानपुरा, जि. खरगोण, मध्यप्रदेश) अशी मृतांची नावे आहेत.

या दुदैवी घटनेनंतर जिनिंगवरील कामगार व टेम्पो चालक यांच्यात वाद झाला. दरम्यान घटनेची माहिती कळताच शेवगाव पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

याबाबत समजलेली हकीगत अशी की, काल रविवारी अवकाळी पाऊस येण्याचा अंदाज असल्याने सरकी पेंडीचे पोते भरलेला टेम्पो जिनिंगच्या शेडमध्ये लावण्यात आला होता. याच शेडमध्ये मध्यप्रदेश येथून कामानिमित्त आलेले लालसिंग मेवाड दोन लहान मुलांसह झोपले होते.

दरम्यान आज सोमवारी सकाळ झाल्यानंतर मेवाड हे झोपेतून उठले. तर सचिन मेवाड व कार्तिक मेवाड ही दोन लहान मुले तशीच झोपलेली होती. त्यावेळी सरकी पेंड भरलेला टेम्पो घेऊन जाण्यासाठी चालक तेथे आला. त्याने कोणताही विचार न करता टेम्पो सुरु करुन वळुन घेण्यासाठी पाठीमागे घेतला. चालकाने टेम्पो मागे घेत असतांना हयगयीने टेम्पो चालवून झोपलेल्या दोघा बालकांना चिरडून टाकले.

या अपघातात दोघा लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर जिनिंगवर काम करणार्‍या कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथे टेम्पो चालक व उपस्थित यांच्यात शाब्दीक चकमक झाल्याची माहिती आहे. या दुदैवी घटनेची माहिती शेवगाव पोलिसांना समजताच घटनास्थळी धाव घेत टेम्पो ताब्यात घेतला.

घटनास्थळाचा पंचनामा करुन दोन्ही बालकांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. टेम्पो शेवगाव पोलिस ठाण्यात आणला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply