Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

पाथर्डी बाजार समितीत सत्तांतर

आ. मोनिका राजळे यांच्या आदिनाथ मंडळाला 17 जागा । विरोधी जगदंबा मंडळाला अवघी 1 जागा

पाथर्डी । वीरभूमी- Apr 29, 2023 • 03:28 PM 8143 views

पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ. मोनिकाताई राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी मंडळाने 17 जागा जिंकत ‘सत्ता परिवर्तन’ घडवले. तर अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्या जगदंबा महाविकास आघाडीला अवघ्या 1 जागेवर (हमाल-मापाडी मतदारसंघ) समाधान मानावे लागले.

पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागेसाठी निवडणुकीत काल सरासरी 97 टक्के मतदान झाले होते. आज सकाळी मतमोजणी होवून सर्वप्रथम सेवा सहकारी संस्था सर्वसाधारण मतदार संघाची मतमोजणी झाली. यामध्ये सर्वच्या सर्व जागांवर आ. राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी मंडळाने विजय मिळवला. यामध्ये वैभव धर्मनाथ खलाटे, जगन्नाथ दादा खेडकर, नानासाहेब यशवंत गाडे, मधुकर शंकर देशमुख, बाळासाहेब मारुती नागरगोजे, सुभाष रभाजी बर्डे, अजय शेषराव रक्ताटे विजयी झाले.

यानंतर सहकारी सोसायटी मतदारसंघातील महिला राखीव जागांची मतमोजणी झाली. यामध्ये सुनिता रामनाथ कोलते, स्मिता पांडुरंग लाड या विजयी झाल्या. या पाठोपाठ सहकारी सोसायटी मतदार संघ (इतर मागासवर्गीय)- अरुण गोविंद रायकर, सहकारी सोसायटी मतदार संघ (विमु्क्त भटक्या जमाती)- जिजाबा तात्याबा लोंढे हे विजयी झाले.

यानंतर ग्रामपंचायत मतदारसंघाच्या सर्वसाधारण जागेवर शेषराव सुर्यभान कचरे, किरण लक्ष्मण राठोड. ग्रामपंचायत मतदारसंघाच्या अनु. जाती जमाती जागेवर रविंद्र बाबुराव आरोळे, ग्रामपंचायत मतदारसंघात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जागेवर नारायण भगवान पालवे हे विजयी झाले.

व्यापारी/आडते मतदार संघात कुंडलिक गणपत आव्हाड, प्रशांत प्रकाशलाल मंडलेचा हे सर्व आदिनाथ शेतकरी मंडळाचे उमेदवार विजयी झाले. तर अ‍ॅड. ढाकणे यांच्या जगदंबा महाविकास आघाडील हमाल मापाडी मतदार संघाच्या एका जागेवर विजय मिळवता आला. या जागेवर बाबासाहेब केदार हे अवघ्या दोन मतांनी विजयी झाले.

आ. मोनिका राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी मंडळाने सोसायटी मतदार संघातील सर्व जागा जिंकल्यानंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. सुरुवातीला सुरु केलेला जल्लोष शेवटच्या जागेपर्यंत कायम होता.

18 पैकी 17 जागा जिंकल्यानंतर आ. मोनिका राजळे समर्थकांनी स्व. राजीव राजळे यांच्या प्रतिमेसह जल्लोष केला. स्व. राजीवर राजळे हयात असतांना अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्या ताब्यात गेलेली बाजार समिती आ. राजळे यांनी पुन्हा ताब्यात आणली. यामुळे एकप्रकारे मतदारांनी स्व. राजीव राजळे यांना वाहिलीली श्रद्धांजलीच ठरली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply