Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पाथर्डी बाजार समितीच्या पदाधिकारी निवडी बिनविरोध

सभापतीपदी सुभाष बर्डे; उपसभापतीपदी कुंडलिक आव्हाड

पाथर्डी । वीरभूमी - May 20, 2023 • 07:52 PM 3674 views

पाथर्डी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपचे जेष्ठ संचालक सुभाषराव बर्डे यांची तर उपसभापतीपदी व्यापारी मतदारसंघातून निवडून आलेले जेष्ठ संचालक कुंडलिकराव आव्हाड यांची वर्णी लागली.   

    आज दुपारी बाजार समितीच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक होऊन पदाधिकारी निवडी संदर्भात चर्चा झाली. पदाधिकारी निवडीबाबत सर्वाधिकार आमदार मोनिकाताई राजळे यांना देण्यात आले. त्यानंतर सभापतीपदासाठी सुभाषराव बर्डे व उपसभापती पदासाठी कुंडलिकराव आव्हाड यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वरील निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. 

यानंतर कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. निवडीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार राजळे यांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांना शुभेच्छा देत बाजार समिती ही शेतकऱ्यांची कामधेनु असून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत चांगला व स्वच्छ कारभार करण्याची अपेक्षा व्यक्त केली. बाजार समितीला गत वैभव प्राप्त करून देत एक चांगले व्यापारी केंद्र म्हणून विकसित करत बाजार समितीचा नावलौकिक वाढवू असे सांगितले.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते बाळासाहेब अकोलकर, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, मृत्युंजय गर्जे, मा.जि.प.सदस्य राहुल राजळे, तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, काशीबाई गोल्हार, ज्येष्ठ संचालक शेषराव कचरे, नारायण पालवे, स्मिता लाड, सुनिता कोलते, अजय रक्ताटे, वैभव खलाटे, प्रशांत मंडलेचा रविंद्र आरोळे, नानासाहेब गाडे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांचा अनेक संस्था व मान्यवरांनी अभिनंदन करीत सन्मान केला.  

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply