Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

भाजप सरकारची महीला विरोधी धोरणे राजळेंनी पटवून द्यावित ः प्रभावती ढाकणे

भाजप सरकारची महीला विरोधी धोरणे राजळेंनी पटवून द्यावित ः प्रभावती ढाकणे

 पाथर्डी । वीरभूमी - Jun 12, 2023 • 02:10 PM 1114 views

राजकारणात महिलांचा सहभाग वाढवावा यासाठी जेष्ठ नेते शरद पवार यांच्या संकल्पनेतुन  सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण मिळाल्याने आज महिला सक्षमपणे आपल्या कामाचा ठसा उमटवत आहे.योगीता राजळेंना मिळालेले पद त्यांनी महिलांचे संघटन करण्यासाठी प्रयत्न करून जिल्हात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. असे प्रतिपादन मा.जि.प. सदस्या सौ.प्रभावती ढाकणे यांनी केले. 

माजी जि. प. सदस्या योगीता राजळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आयोजीत सत्कार समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी तालुकाध्यक्षा सविता भापकर, माजी नगराध्यक्षा रत्नमाला उदमले, माजी नगरसेविका ज्योती बोरूडे, मनिषा ढाकणे, ज्योती जेधे, दिपाली आंधळे, संगीता शेटे, सुवर्णा कोकाटे, संगीता जेधे, शितल शेटे, मिना सदावर्ते, शाहीन आतार आदी उपस्थित होते.

सौ.ढाकणे म्हणाल्या भाजप सरकारच्या मागील नऊ वर्षात प्रचंड महागाई वाढली त्यामुळे गृहीनी म्हणुन घर संभाळतांना होणार्‍या तारेवरच्या कसरतीची सार्वधिक जाणीव महिलांनाच आहे. इंधन दरवाढीत गॅस आज जवळपास बाराशे रूपयांच्या जवळ पोहचला आहे.जीवनावश्यक वस्तुंचे ही दर गगनाला भिडले आहेत आणि आज अशा परिस्थितीत भाजप मोदी सरकारच्या नऊ वर्षाच्या  कार्यकाळाचा जल्लोष सामान्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करतेय ही बाब अतिषय निंदनिय आहे.

दुसरीकडे त्याआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या केंद्रातील सरकारने महागाईचा दर आटोक्यात ठेवत सामान्यांच्या हितासाठी काम केले. जेष्ठ नेते शरद पवार यांच्या दूरदृष्टीने आज महाराष्ट्रात महिलांचा यथोचित सन्मान होतो आहे. गावपातळीवरील संस्थामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाल्याने महिलांचा आत्मविश्वास उंचावला आहे.

योगीता राजळे यांनी मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी भाजप सरकार व पक्ष कसा महिला व सर्वसामान्यांच्या विरोधी धोरणे ठरवितो हे महिलांमध्ये प्रकर्षाने मांडेल. सुत्रसंचालन करून आभार आरती निर्‍हाळी यांनी मानले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply