Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

मिरजगाव येथे पायी दिंडी वारी मार्गाची जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी

वारकर्‍यांच्या सोयी-सुविधेबाबत स्थानिक अधिकार्‍यांना दिल्या सूचना

 मिरजगाव । वीरभूमी - Jun 13, 2023 • 12:38 PM 1127 views

आषाढी एकादशी निमित्त श्री.क्षेत्र पंढरपूरकडे जाणार्‍या पायी दिंडी वारीतील वारकर्‍यांना पुण्याच्या धर्तीवर सुविधा मिळावी. यासाठी नुकतेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नगर येथे जिल्हाभरातील दिंड्यांचे प्रमुख व अधिकारी यांची आढावा बैठक घेतली असता, त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी मिरजगाव येथे पायी दिंडी वारी मुक्कामी ठिकाण जिल्हा प्राथमिक शाळा मिरजगाव तसेच नगर-सोलापूर हायवेने मिरजगाव पोलिस स्टेशन हद्दीतून जाणार्‍या दिंडी मार्गाची रविवार दि.11 रोजी पाहणी केली. व येथील परिस्थिती बाबतचा आढावा घेतला. यावेळी पंढरपूर येथे पायी दिंडीने जाणार्‍या भाविकांसाठी आरोग्य सोयी-सुविधा पुरविणे.

तसेच पोलीस स्टेशन हद्दीतील मंगल कार्यालय दिंडीतील नागरिकांसाठी उपलब्ध करून देणे बाबत गटविकास अधिकारी यांना तसेच पायी दिंडीने जाणार्‍या मार्गावर भाविकांच्या सुरक्षिततेकरिता व ट्रॉफिक वळविण्याकरिता मिरजगाव पोलिसांना बंदोबस्त देण्याबाबत सूचना दिल्या असुन तेथील अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली. यावेळी कर्जतचे तहसीलदार जगदाळे,  पीडब्लू व नॅशनल हायवेचे अधिकारी, सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिष दराडे, शंकर बचाटे, मंडळाधिकारी केदार, तसेच सरपंच नितीन खेतमाळस स्थानिक ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

लाखो भाविक वारकरी वर्षानुवर्षे पंढरपूरची वारी करत आहेत. प्रशासनाची मदत मिळो अथवा ना मिळो दिंडी सुरूच राहणार आहे. मात्र शासन आणि प्रशासनाची देखील जबाबदारी आहे. त्याअनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातून आषाढीला जाणार्‍या प्रत्येक दिंडीला मुक्कामाच्या ठिकाणी पाणी, आरोग्य, सुरक्षा, व्यवस्थेचे नियोजन अहमदनगर जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. आवश्यकती मदत आणि संपर्क करण्यासाठी प्रशासनाने पंढरीची वारी शासन आपल्या दारी वॉर रुम तयार केली आहे. वारकर्‍यांची वारी सुखरूप व्हावी या भावनेतून पुण्यातील दिंडीच्या धर्तीवर हे नियोजन यंदा प्रथमच जिल्ह्यातून जाणार्‍या शेकडो पायी दिंडी करिता करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply