Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

शेवगावचा ‘विशाल’ जिल्ह्यातून हद्दपार

प्रांताधिकारी प्रसाद मते यांचे आदेश । शेवगाव पोलिस निरीक्षकांनी दिला होता हद्दपारीचा प्रस्ताव 

शेवगाव । प्रतिनिधी - Jun 20, 2023 • 11:32 AM 5436 views

मागील काही दिवसापासून पोलिस व महसूल प्रशासनाला वेठीस धरणार्‍या विशाल विजयकुमार बलदवा (रा. श्रीराम कॅलनी, शेवगाव) याला समाजविघातक कृत्ये व गुन्हेगारी वृत्तीमुळे जिल्ह्यातून हद्दपार करावा, असा प्रस्ताव शेवगाव पोलिसांनी पाथर्डी प्रांताधिकारी यांचेकडे दाखल केला होता. या प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी विशाल विजयकुमार बलदवा याला दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत.

विशाल विजयकुमार बलदवा (रा. श्रीराम कॉलनी, शेवगाव) हा गुन्हेगारी वृत्तीचा असून त्याच्यावर शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वागण्यामुळे समाजविरोधी व विघातक कृत्यांना प्रोत्साहान मिळत आहे. त्याच्यावर कायद्याचे कुठल्याच प्रकारचे बंधन नसल्यासारखे तो शेवगाव शहरात व तालुक्यात धाडसी वृत्तीने वागत असल्याने लोकांमध्ये दहशतीचा व चिंतेचा विषय झाला आहे.

त्याच्या वागण्यामुळे स्थानिक व परिसरातील नागरीक आक्रमक भूमिका घेवून आंदोलन करणे, मोर्चा काढणे, रास्तारोको करणे असे प्रकार करण्याची शक्यता आहे. यामुळे शेवगाव शहराची व तालुक्याची शांतता व सुव्यवस्थेस भंग होण्याची दाट शक्यता आहे. तो कोणताही कामधंदा करत नसून त्याला उदरनिर्वाह करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा आर्थिक स्त्रोत नाही. तो कोणालाही जुमानत नसून गंभीर गुन्हे करण्याच्या सवयीचा झालेला आहे.

त्याच्या दबाव व भितीपोटी त्याच्या विरोधात कोणीही जबाब देण्यास तयार होत नाही. त्यामुळे विशाल बलदवा यास दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करावे, असा प्रस्ताव शेवगाव पोलिस निरीक्षकांनी प्रांताधिकारी यांच्याकडे सादर केला होता.

या प्रस्तावाची चौकशी केल्यानंतर प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी विशाल विजयकुमार बलदवा (रा. श्रीराम कॉलनी, शेवगाव) याला अहमदनगर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply