Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

अनधिकृत सेतू केंद्रावर कारवाई करा

पाथर्डी तालुक्यातील सेतू चालकांचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन

पाथर्डी । वीरभूमी - Sep 01, 2023 • 01:20 PM 1671 views

पाथर्डी तालुक्यात अनाधिकृत सेतू केंद्राचे पेव फुटले असून अनेक अनधिकृत सेतू केंद्र सध्या तालुक्यात कार्यरत असून या ठिकाणी ग्रामीण भागातील जनतेची मोठी आर्थिक पिळवणूक होत आहे. सध्या राज्यात शासकीय नोकर भरती मोठ्या प्रमाणात चालू असून यासाठी लागणारे विविध दाखल्यासाठी तरुणांची या ठिकाणी मोठी गर्दी असते त्यांची ही आर्थिक लूट या ठिकाणी होत आहे.

लोकसेवेसाठी सरकारने उभारलेल्या या योजनेमध्ये मोठी आर्थिक उलाढाल होते. सर्वसामान्य जनतेच्या या आर्थिक पिळवणुकीमध्ये महसूल विभागाचाही काही सहभाग आहे का हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हे अनाधिकृत सेतू केंद्र बंद करून जनतेची व शासनाची होणारी फसवणूक थांबवावी अशी मागणी अनेक अधिकृत सेतू चालकांनी प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर बाबासाहेब चौधर, शारदा गरुड, सुदाम जायभाये, आनंद रंधवे, संभाजी म्हस्के, रंगनाथ चितळे, ज्ञानेश्वर गव्हाणे, जीवन बडे, विजय ढाकणे, अजय रक्ताटे, हरेश केदार, रवींद्र शिवणकर, संभाजी चितळे, सचिन मरकड, संदीप काजळे आदींच्या निवेदनावरती स्वाक्षर्‍या आहेत.

या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डी तालुक्यात महा-ई-सेवा केंद्राचे अधिकृत असे 23 केंद्र असून त्यापैकी 19 सेतू केंद्र आज पर्यंत चालू आहेत. परंतु शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला ऑपरेटरच्या नावाने आपले सरकार सेवा केंद्र मंजूर केलेले आहे.

परंतु ग्रामपंचायत ऑपरेटर हे त्यांना दिलेला आयडी त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये न चालवता, तालुक्याच्या ठिकाणी किंवा जास्त लोकसंख्येच्या गावांमध्ये अनधिकृतपणे चालवत आहेत. किंवा दुसर्‍यांना भाडेतत्त्वावर देऊन अनधिकृतपणे एजंट तयार केलेले आहेत. त्यामुळे तालुक्यातील अधिकृत सेतू चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ग्रामपंचायत ऑपरेटरांना शासन दरमहा सात हजार रुपये मानधन देत आहे तरी ते ग्रामपंचायत मध्ये न बसता तालुक्याच्या ठिकाणी किंवा जास्त लोकसंख्येच्या गावी आयडी चालवत आहेत. तसेच अनेकांची आयडी हे अनेक ठिकाणी चालू आहे.

असे अनधिकृत सेतू केंद्रावर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा सेतू केंद्र, जिल्हाधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply