Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

पारनेरच्या लेकींनी केली कमाल, देश सेवेत होतील बेमिसाल

पारनेरच्या तीन तरुणी भारतीय नौसेनेत दाखल । सर्वत्र होतेय कौतुक

लतिफ राजे । वीरभूमी - Sep 02, 2023 • 11:21 AM 1311 views

 पारनेर : पारनेर तालुका म्हटले की, दुष्काळी भाग डोळ्यासमोर येतो. तरी पण यावर मात करून येथील तरुणाईने राज्याला शिक्षक पुरविणारा तालुका अशी ओळख निर्माण केली. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अनेकांनी प्रशासकीय अधिकारी, सनदी अधिकारी या पदांना गवसणी घातलेली पाहायला मिळते. यात मुलांप्रमाणेच मुली ही आघाडीवर आहेत, हे आपल्याला पाहायला मिळत आहे. यातच पारनेरच्या तीन लेकींनी भारतीय नौसेनेत दाखल होत पारनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

यामध्ये पारनेर येथील तराळवाडीची शुभांगी देवेंद्र बढे, वडनेर हवेलीची अंतरा अरुण रेपाळे तर पिंपरी जलसेनची दिव्या सतीश अडसरे या तिघींची या ठिकाणी निवड झाली आहे. देशभरातून जवळपास 273 मुलींची निवड झाली होती त्यात या पारनेरच्या तीन लेकी आहेत. बहुतेक पारनेर तालुक्यातील नौसेनेत निवड होणार्‍या त्या सर्वप्रथम आहेत. 4 सप्टेंबर 2023 पासून या पारनेरच्या लेकी भारतीय नौसेनेत आपल्या देशसेवेला सुरुवात करीत आहे.

पारनेर येथील सेवानिवृत्त सैनिक विठ्ठल बडे यांची नात शुभांगी देवेंद्र बढे हिने व तिघी मैत्रिणीने अग्निवीर जाहिरात वाचल्यानंतर भारतीय नौसेनेचे फॉर्म भरले होते व त्यामध्ये त्या तिघीही कॉलेज मैत्रिणी यशस्वी होऊन भारतीय नौसेनेच्या प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झाली होती. शुभांगी बढेच्या वडीलांचे 2021 साली कोरोनामध्ये निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळलेले असताना शुभांगीने हार न मानता ती नौसेनेच्या प्रशिक्षणासाठी 11 नोव्हेंबर 2022 रोजी ओडीसा येथील आयएनएस चिल्का या ठिकाणी हजर झाली.

शुभांगी हे खडतर प्रशिक्षण पूर्ण करणार नाही अशी भीती घरच्यांना वाटत असताना तिने चार महिन्याचे पायाभूत प्रशिक्षण पूर्ण केले. यामध्ये पोहणे, फायरिंग, बोट पोलींग, खेळणे, ड्रीलचे कठीण असे चार महिन्याचे प्रशिक्षण होते. त्यानंतर गुजरातमधील आयएनएस वलसुरा येथे जहाजाशी संबंधित माहितीचे संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केले.

चार चार महिन्यांच्या या दोन्ही प्रशिक्षणामध्ये पास झाल्यानंतर आता तिची नियुक्ती केरळमधील आयएनएस कोची येथे झाली असून 4 सप्टेंबर पासून ती आपल्या देशसेवेच्या कर्तव्याला सुरुवात करीत आहे. आपल्या कुटुंबांचा आधार बनत शुभांगी ग्रामीण भागातील सर्व मुलींसाठी एक प्रेरणास्थान होत आहे. पारनेरच्या या तीन लेकी आपल्या देशाच्या सागरतटाच्या सिमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावतील यात शंकाच नाही. यासाठी त्यांना सर्व भारतीयांकडून हार्दिक शुभेच्छा.

पारनेर मधील शुभांगी प्रमाणेच वडनेर हवेली येथील शेतकरी कुटुंबातील अंतरा अरुण रेपाळे हीच पण नौसेनेत निवड झाली आहे. आई वडील शेती करतात, मात्र पहिल्यापासूनच तिला देशसेवेची आवड असल्याने तिनेही नौसेनेसाठी अर्ज केला होता. तिची निवड झाल्यानंतर तिने ओडीसा येथील आयएनएस चिल्का येथे आपले चार महिन्याचे पायाभूत प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुढील प्रशिक्षण केरळ येथील आयएनएस कोची येथे पूर्ण झाले आहे. 4 सप्टेंबर रोजी शुभांगी ही आपल्या देश सेवेला ओडीसा येथील आयएनएस चिल्का येथून सुरुवात करणार आहे.

पारनेर तालुका हा दुष्काळी जरी असला तरी येथील तरूणाई ही ध्येयवेडी आहे. पिंपरी जलसेन येथील शेतकरी कुटुंबातील दिव्या सतीश अडसरे ही आपल्या मैत्रिणींबरोबर देशसेवेचे व्रत घेऊन होती. देशभरातून नौसेनेसाठी 273 मुलींच्या निवडीमध्ये तिचा नंबर लागल्याने घरात आनंदीआनंद झाला होता. दिव्या हिने उडीसा येथील आयएनएस चिल्का येथे पायाभूत प्रशिक्षण पूर्ण केले तर त्यानंतरचे प्रशिक्षण केरळ येथील आयएनएस कोची येथे पूर्ण केले. तीही 4 सप्टेंबर रोजी गुजरात मधील आयएनएस वलसुरा येथून आपल्या देशसेवेच्या कर्तव्याला सुरुवात करणार आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply