Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

शिर्डी येथील अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा

तीन आरोपी ताब्यात । 45 गॅस टाक्यासह तब्बल सात लाखांचा मुद्देमाल जप्त

 शिर्डी । वीरभूमी -  Sep 13, 2023 • 10:52 AM 2036 views

शिर्डी येथील हेलिपॅड रोड 11 नंबर चारी येथे चार चाकी वाहनांमध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करत असतांना पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी 45 गॅस टाक्यासह तब्बल सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिर्डी येथील हेलिपॅड रोड, 11 नंबर चारी येथे चार चाकी वाहनांमध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करत असल्याची माहिती पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके यांना समजली. या माहितीची खातरजमा करुन पोलिस उपअधिक्षक मिटके यांनी राहाता तहसीलदार अमोल मोरे यांना संयुक्त कारवाई करण्याकरिता माहिती दिली असता त्यांनी राहाता तहसील कार्यालय येथील पुरवठा निरीक्षक भारत खरात यांना संयुक्त कारवाई करण्याकरीता पाठवले.

त्यावर सदर ठिकाणी पथकातील कर्मचारी पाठवून  पंचासमक्ष छापा टाकुन दोन चार चाकी वाहनांसह गॅस सिलेंडर भरण्याचे रिफिलिंग मशीन व 35 घरगुती गॅस टाक्या तसेच 10 कमर्शियल गॅस टाक्या जप्त करण्यात आले आहेत.

तसेच संदीप पांडुरंग मते (वय 39, रा. कातोरे वस्ती, निमगाव, ता. राहाता), अनिस मोहम्मद सय्यद (वय 48, रा. श्रीरामनगर, शिर्डी, ता. राहाता) व विवेक राजेंद्र आव्हाड (रा. चांगदेवनगर, निमगाव, ता. राहाता) या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींच्या ताब्यातून चार चाकी वाहने, गॅस टाक्या, मशीन असा एकूण 7 लाख 7 हजार 95 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरील आरोपी विरुद्ध शिर्डी  पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3, 7 आणि भारतीय दंड संहिता 1860 कलम 285 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या कारवाईमुळे शिर्डी परिसरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके, पोनि. गुलाबराव पाटील, पुरवठा निरीक्षक भारत खरात, पोहेकॉ. इरफान शेख, पोकॉ. अशोक शिंदे, पोकॉ. दिनेश कांबळे, पोहेकॉ. आप्पासाहेब थोरमिसे यांनी केली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply