Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

रेणुकामातेच्या दरबारातील सत्कार अविस्मरणीय : पोनि. दिनेश आहेर

रेणुकामाता मंदिरातील तपास लावल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचा सन्मान

शेवगाव । वीरभूमी - Sep 24, 2023 • 10:36 AM 1129 views

रेणुकामाता देवस्थानात चोरी झाली तेव्हा आलो असतांना रेणुकामाते प्रती असलेली लोकांची श्रध्दा व भावना लक्षात आली. घटनांचे गांभीर्य ओळखून, आम्ही एकाच्या मागावर असतांना मातेचीच कृपा झाली. आमच्या सर्व सहकार्‍याच्या अथक प्रयत्नाला यश आले. तब्बल 22 ठिकाणी चोरी करणारी टोळी जेरबंद झाली. असे तपास लागल्यावर वरिष्ठाकडून, राजकीय मंडळीकडून आमचे कौतूक होत असते. मात्र आज अमरापूर ग्रामस्थ व रेणुकामाता मल्टिस्टेट परिवाराकडून प्रत्यक्ष मातेच्या दरबारात होणारा सत्कार सोहळा अविस्मरणीय व सर्वात वेगळा असल्याचे प्रतिपादन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी केले.

शेवगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र अमरापूर येथील रेणुकामाता मंदिरात मागील महिण्यात चोरीची घटना घडली होती. या चोरीच्या घटनेतील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत मुद्देमाल हस्तगत केला. या दरम्यान आरोपींकडून तब्बल 22 गुन्हे उघडकीस आले. मंदिरातील चोरीच्या घटनेचा तपास लावल्याबद्दल अमरापूर ग्रामस्थ व रेणुकामाता परिवाराच्यावतीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर व त्यांच्या पथकाचा रेणुकामाता देवस्थानच्या सभागृहात सत्कार करण्यात आला त्यावेळी  ते बोलत होते.

यावेळी ह.भ.प. राम महाराज झिंजूर्के, हनुमानटाकळी देवस्थानचे महंत आप्पा महाराज, रेणुकामाता मल्टिस्टेटचे डॉ. प्रशांतनाना भालेराव, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके, सरपंच आशाताई गरड, राहुल जोशी, शिवसेनेचे रामदास गोल्हार, श्रीमंत घुले, डॉ. अरविंद पोटफोडे, बाळासाहेब चोधरी, एकनाथ कुसळकर यांचेसह ग्रामस्थ व भक्तपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोनि. दिनेश आहेर म्हणाले की, येथे ज्या व्यासपिठावर अधिकार्‍याचा सत्कार होतो आहे. त्याच व्यासपिठावर माझ्या सर्व सहकार्‍याचा ही सत्कार झाला, याचा मला अभिमान आहे. मागील तीन महिण्यात अनेक मंदिरात चोरीच्या घटना घडल्या. प्रत्येक घटना पोलिसांच्या दृष्टीने गांभीर्याची असते. येथे ही आम्ही आमचे काम केले आहे. एक प्रकारे ही रेणुकामातेची सेवा घडली आहे.

ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव यांनी देवस्थान चोरी प्रकरणाचा तपास लावल्याबद्दल पोलिस यंत्रणेला धन्यवाद देऊन देवस्थानात चोरी झाली. यापेक्षा असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रत्यक्ष रेणुका आईसाहेबांच्या व्यासपीठावर चोरटे बिनदिक्कत पादत्राणासह चढले ही घटनाच मला मोठी व्यथीत करणारी, सहन होण्यापलीकडची आहे. अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी ते अत्यंत भावनावश झाले होते.

रमेश अप्पा महाराज, माजी आ. बाळासाहेब मुरकुटे, सरपंच आशाताई गरड यांनीही मनोगत व्यक्त करत पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक केले. प्रारंभी शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे पथकासह अमरापुर गावात दाखल होताच त्यांचे फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी अमरापुर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थाच्या वतीने सर्व पथकाचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर श्री. रेणुका माता मल्टीस्टेट संस्थेच्या वतीने गावातून अधिकार्‍यांची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्याचेवर एका बाजूने शाळकरी मुलांनी तर दुसर्‍या बाजूने ग्रामस्थांनी फुलांची मुक्त उधळण केली. मिरवणूक श्री. रेणुका माता देवस्थान परिसरात  दाखल होताच तोफाची आतषबाजी झाली.

सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांचे महिलांनी औक्षण केले. त्यानंतर भक्त निवासात झालेल्या सत्कार सोहळ्यात पोलीस निरिक्षक दिनेश आहेर, सपोनि. सोपान गोरे, सपोनि. तुषार धाकराव, सहायक फौजदार भाऊसाहेब काळे यांच्यासह पथकातील दत्तात्रय हिंगडे, मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, सुरेश माळी, रविंद्र कर्डीले, संतोष लोढे,  भिमराज खर्से, रणजित जाधव, प्रशांत राठोड, भरत बुधवंत, अरुण मोरे, विजय ठोंबरे, संभाजी कोतकर यांचा फेटा, शाल, श्रीफळ, फुलांचा गुच्छ, मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी हनुमान टाकळी ग्रामस्थ, शेवगाव रोटरी क्लब, शेवगाव पत्रकार संघाच्या वतीने देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सुखदेव मर्दाने यांनी केले तर अ‍ॅड. गणेश शेंडगे यांनी आभार मानले.

पथकावर बक्षिसांचा वर्षाव : स्थानिक गुन्हे शाखेच्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतूक व प्रोत्साहन म्हणून डॉ. प्रशांतनाना भालेराव यांनी 51 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले. तेव्हा आम्ही आमचे काम केले. ही रेणुका मातेची सेवा आहे म्हणून ही रक्कम पोलिस दलातील पॉवर लिप्टींग मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या महिला पोलिस अर्चना काळे यांना भेट देत असल्याचे पोनि. आहेर यांनी नम्रपणे जाहीर केले. यावेळी उपस्थितांनी टाळ्याच्या कडकडाटात त्यांना दाद दिली. तसेच  गावच्या सरपंच आशाताई गरड यांनी देखील चोरीचा तपास लावल्याबद्दल कौतुकाची थाप म्हणून यावेळी 11 हजार रुपये रोख बक्षीस दिले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply