Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

घोड कालव्याचा मोर्‍यांचा पुल कोसळला

पुलाची दुर्दशा दै. वीरभूमीने उजेडात आणूनही परिस्थिती जैसे थे । आवर्तनात झाले असते मोठे नुकसान

 विजय उंडे । वीरभूमी - Oct 01, 2023 • 01:20 PM 1051 views

 श्रीगोंदा : मढेवडगाव ते श्रीगोंदा कारखाना दरम्यान असलेल्या महादेवी वस्तीजवळील म्हातारपिंप्री हद्दीतील घोड डावा कालव्याचा मोर्‍याचा पुल शुक्रवारी कोसळला. नुकत्याच झालेल्या आवर्तनकाळात हा पूल कोसळला असता तर कालवा फुटून अनेक शेतकर्‍यांच्या कालव्या लगतच्या शेकडो एकर शेतजमिनी व उभी पिके वाहून जाऊन कोट्यावधी रुपयांचे नुकसान सोसावे लागले असते.

याबाबत आठ महिन्यांपूर्वी गेल्या फेब्रुवारी महिन्यात दै. वीरभूमीने पडझड झालेल्या पुलाची बातमी देऊन पाटबंधारे विभागाला जाग आणली होती. याची घोड पाटबंधारे विभागाचे उपअभियंता मारूती ठणके यांनी लागलीच दखल घेऊन याबाबत कुकडी पाटबंधारे विभाग व अधिकार्‍यांना धोका लक्षात आणून दिला होता. कार्यकारी अभियंता व तंत्रज्ञान विभागाच्या अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष भेटही दिली होती. मात्र प्रशासनाच्या लालफितीत कागदपत्रे अडकल्याने या पुल दुरुस्तीसाठी अजुनही मुहूर्त सापडला नाही.

श्रीगोंदा, शिरूर, कर्जत तालुक्याला समृद्धीकडे नेऊन लोकांचे जीवनमान उंचावणार्‍या घोड धरणाच्या डावा कालवा व चार्‍यांची आज वयपरत्वे जीर्ण अवस्था झाल्याने कालव्यावरील पुल व वितरिकांची दुरावस्था झाली आहे. अनेक ओढ्यांवरील पुलाच्या मोर्‍यांच्या भिंती ढासळत असून घोड व कुकडी पाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने शेतकर्‍यांच्या शेतजमिनीला मोठा धोका निर्माण झाला आहे.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1953 साली धरणाची मुहूर्तमेड रोवून 1965 पर्यंत काम चालले. धरणाचे पाहिले आवर्तन 1968 साली झाले. 7.5 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या धरणात दोन टीएमसी मृतसाठा आहे. उपयुक्त 5.5 टीएमसी पाणीसाठा वापरण्यायोग्य आहे. श्रीगोंदा तालुक्यातील 36 गावे व कर्जत तालुक्यातील 19 गावे बागाईत झाली.

अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना, नागवडे साखर कारखाना, घोडगंगा साखर कारखाना, श्रीगोंदा, काष्टी, बेलवंडी सारख्या मोठया गावांची पाणीपुरवठा योजना व रांजणगाव गणपती येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत याच धरणावर अवलंबून आहे. पण पाटबंधारे खात्याच्या कासवगतीच्या कारभारामुळे आज पूर्ण क्षमतेने भरलेल्या धरण, कालवा व वितरीकांची केविलवाणी अवस्था झाली आहे.

दोन वर्षापुर्वीच्या नुकसानीची आठवण : दोन वर्षापूर्वी चिंभळा परिसरात कालवा फुटल्याने अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी वाहून गेल्या होत्या. त्यात अनेक शेतकर्‍यांचे न भूतो न भविष्यती नुकसान झाले होते. त्यातच आता म्हातारपिंप्री हद्दीतील कोसळलेला पुल दुरुस्त न केल्यास येणारे रब्बी आवर्तन लांबण्याची चिन्हे आहेत.

येत्या आवर्तना अगोदर पुलाची दुरुस्ती होणार ः अभियंता ठणके : घोड पाटबंधारे विभागाचे उपअभियंता मारूती ठणके यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले की दै. वीरभूमीने आठ महिन्यांपूर्वी पुलाची दुरावस्था निदर्शनास आणून दिली होती. मी तातडीने याबाबत वरिष्ठांना कळवले होते. या दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया करून कामाची परवानगी देण्यात आली आहे. येत्या आवर्तनाआधी पुलाची तातडीने दुरुस्ती करणार आहोत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply