Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कुर्‍हाडीचा घाव घालून मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून

फुंदे टाकळी येथील घटना । पाथर्डी पोलिस ठाण्यात मोठ्या भावावर गुन्हा दाखल 

पाथर्डी । वीरभूमी - Oct 09, 2023 • 09:24 PM 11186 views

आई-वडील दारू प्यायला पैसे देत नाहीत पण लहान भावालाच कसे पैसे देतात. याचा राग येऊन  सख्ख्या मोठ्या भावाने झोपलेल्या लहान भावाच्या डोक्यात कुर्‍हाडीचा घाव घालून जागीच ठार केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी येथे घडली आहे. निलेश विष्णू फुंदे (वय 28) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवार दि. 9 रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फुंदे टाकळी येथील खिळा वस्तीवर ही घटना घडली. वडील विष्णू काशिनाथ फुंदे (वय 65) यांनी मोठा मुलगा बाबाजी विष्णू फुंदे याचे विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विष्णू काशिनाथ फुंदे व त्यांची पत्नी चंद्रकला या फुंदे टाकळी येथील खिळा वस्तीवर राहतात.त्यांना बाबाजी व निलेश अशी दोन मुले असून शेती व्यवसाय करून उपजीविका करतात.

मोठा मुलगा बाबाजी दारू पिण्याकरता वेळोवेळी पैसे मागत असे. पैसे मिळाले नाही की आई-वडिलांशी वाद घालत असे.लहान मुलगा निलेश हा वाद घालू नको म्हणून मोठ्या भावाला नेहमी समजावून सांगत असे. नेहमीच समजावून सांगतो म्हणून बाबाजीला लहान भाऊ निलेशचा राग होता.

सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बाबाजीने  दारू पिण्याकरीता आई-वडिलांकडे पैसे मागितले. मात्र त्याला पैसे दिले नाहीत. तुम्ही मला पैसे देत नाहीत मात्र लहान भाऊ निलेशला नेहमीच पैसे देता. त्याला एकदाचा संपवूनच टाकतो, असे म्हणत बाबाजीने घरातील कुर्‍हाड घेऊन झोपलेल्या लहान भावाच्या डोक्यात घाव घातला.

कुर्‍हाडीच्या घावाने गंभीर जखमी झालेला निलेश जागीच बेशुद्ध झाला होता. शेजार्‍याच्या मदतीने त्याला पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परिस्थिती गंभीर असल्याचे पाहून डॉक्टरांनी अहमदनगरला हलवण्याचे सांगितले. अहमदनगर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच निलेश मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी बाबाजीच्या विरोधात पाथर्डी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी बाबाजीला ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे पुढील तपास करत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply