Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी जाणार्‍या एसटी बसच्या शेवगावात काचा फोडल्या

एसटी बस पुन्हा आगारात दाखल । अनेक बस रिकाम्याच आल्या

शेवगाव । वीरभूमी - Oct 26, 2023 • 09:50 AM 5532 views

विविध विकास कामांचे उद्घाटन व भुमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी येथे येत आहेत. या कार्यक्रमासाठी लोकांना जाण्यासाठी प्रत्येक गावातून एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातच मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून गावागावात राजकीय पुढार्‍यांना बंदी करण्यात आली आहे. शिर्डी येथील सभेसाठी लोकांना घेवून जाण्यासाठी शेवगाव तालुक्यातील  मंगरुळ येथे गेलेल्या एसटी बसच्या अज्ञातांनी काचा फोडल्याची घटना आज सकाळी घडली. यामुळे ही बस चालकाने पुन्हा शेवगाव आगारात आणली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध विकास कामांचे उद्घाटने व भुमिपुजनासाठी आज गुरुवारी शिर्डी येथे येत आहेत. तसेच शिर्डी येथे भव्य शेतकरी मेळावा व शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत आहे. यामुळे या कार्यक्रमाला गर्दी करण्यासाठी प्रत्येक गावातून एसटी बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

त्यातच सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून गावागावांत राजकीय पुढार्‍यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. शिर्डी येथील कार्यक्रमांसाठी लोकांना घेवून जाण्यासाठी एसटी बस आज सकाळी शेवगाव आगारातून मंगरुळ येथे पोहोचली. एसटी बस (क्र. एमएच. 14, बीटी 2158) गावामध्ये येताच अज्ञाताने दगडफेक करत बसची मागील काच फोडली.

या घटनेनंतर चालक पी. जे. फुंदे यांनी बस पुन्हा शेवगाव आगारात आणली. आगारात बसचा पंचनामा करण्यात आला असून याप्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र शिर्डी येथे कार्यक्रमासाठी जाणार्‍या अनेक बस मोकळ्याच परतत असल्याचे चित्र आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply