Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पाथर्डी, शेवगाव तालुके दुष्काळी जाहीर करा

आ. मोनिकाताई राजळे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

पाथर्डी । वीरभूमी - Nov 09, 2023 • 12:53 PM 1573 views

यावर्षी शेवगाव व पाथर्डी तालुक्यात अत्यंत कमी पर्जन्यमान झाल्याने खरीपाची पिके पावसा अभावी जळुन गेली रब्बी पिकांची पेरणी नाही. सध्या चारा व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे शेवगाव व पाथर्डी तालुक्याचा दुष्काळी तालुक्याच्या यादीत सामावेश करून दुष्काळी उपाययोजना तातडीने लागु करून शेतकर्‍यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी आमदार मोनिका राजळे यांनी उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.

याबाबत लवकरच फेरआढावा घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे अश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी यावेळी दिले. मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहावर आमदार मोनिका राजळे व भाजपाचे शेवगाव-पाथर्डी विधानसभा निवडणुक प्रमुख नारायण पालवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेवगाव पाथर्डी तालुक्यातील सद्यस्थितीतील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करून सविस्तर महिती दिली.

याबाबात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्रातील इतर दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्याप्रमाणेच पाथर्डी व शेवगांव तालुके दुष्काळी जाहीर होणे अत्यंत गरजेचे आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने अहमदनगर जिल्हयात सर्वत्र दुष्काळी परिस्थीती आहे. विशेषत: पाथर्डी व शेवगांव तालुक्यामध्ये अत्यंत अल्प पाऊस झालेला आहे.

दोन्ही तालुक्यातील सर्व महसूल मंडळातील खरीपाची पिके वाया गेली असून रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्याही झाल्या नाहीत. त्यामुळे दोन्ही तालुके दुष्काळी परिस्थीतीच्या निकषात बसत असूनही संबंधीत कंपनीच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे पाथर्डी व शेवगांव तालुके दुष्काळी उपाययोजनापासून वंचीत राहण्याची परिस्थीती निर्माण झाली आहे.  या तालुक्यातील सर्व बंधारे, पाझर तलाव, के. टी. वेअर बंधारे, विहीरी, नद्या, नाले कोरडेठाक पडले आहेत.

त्यामुळे शासकीय धोरणात्मक निकषांची, केंद्र शासन संहीता निर्देशांक, कृषी व महसूल विभागाचे सत्याता पाहणी या सर्व बाबींचा फेरविचार होवून दोन्ही तालुक्यातील शेतकर्‍यांची प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी करुन, जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्यमानाची तुट उपलब्ध भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष व वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, पेरणी खालील क्षेत्र व पिकांची स्थिती,

या सर्व घटकांचा अभ्यास करावा व कृषी, महसूल, मदत व पुर्नवसन विभागाने या संदर्भात तातडीने निर्णय घेऊन पाथर्डी व शेवगांव तालुके दुष्काळी जाहीर करण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणीही आमदार मोनिका राजळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  केली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply