Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

अकोले भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

‘हा’ विजय म्हणजे मोदीजींप्रति लोकभावनांचे प्रतिबिंब ः माजी आ. वैभवराव पिचड

अकोले । वीरभूमी - Dec 04, 2023 • 02:03 PM 1128 views

मध्यप्रदेश, राजस्थान व छत्तीसगढमध्ये भाजपने विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवत सत्तेकडे कूच केल्याने अकोले भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजपच्या येथील कार्यालयात मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले. कार्यलयात टीव्ही स्क्रीन लावण्यात आली होती. निकाल येत होते तसतसे कार्यकर्ते ‘भाजप झिंदाबाद’, ‘जय श्रीराम’ हर हर मोदी, घर घर मोदीच्या घोषणा देत होते.

तीन राज्यातील हा विजय म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या विकास कामाची पावती असून यातून जनतेचा पंतप्रधान मोदी यांच्यावर असलेला विश्वास आहे,अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत पेढे वाटून आनंद व्यक्त केला. पक्षाचे तालुका अध्यक्ष यशवंत अभाळे, जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे, भाजप तालुका सरचिटणीस राहुल देशमुख, मच्छिंद्र मंडलिक, सचिन जोशी, महिला अध्यक्षा सोनाली नाईकवाडी, नगराध्यक्ष रबाळासाहेब वडजे, जिल्हा उपाध्यक्ष सोमदास पवार, धनंजय संत, महिला तालुकाध्यक्ष रेश्मा गोडसे, अशोक आवारी, कैलास तळेकर, सखाहारी पांडे, मच्छिंद्र चौधरी, शुभम खर्डे यांनी एकमेकांना पेढे भरवले.

हा विजय म्हणजे मोदीजींप्रती लोकभावनांचे प्रतिबिंब : हा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींप्रती लोकभावनांचे प्रतिबिंब आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदीजींचीच सत्ता आलेली लोकांना हवी आहे, अशा भावना माजी आमदार वैभवराव पिचड यांनी व्यक्त केल्या.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply