Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कर्जतमध्ये आरपीआयचे रास्तारोको आंदोलन

मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशद्वारालगत लावलेला अनधिकृत फलक काढण्याची मागणी

कर्जत । वीरभूमी - Dec 30, 2023 • 10:00 AM 1221 views

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारालगत अनधिकृत आणि विना परवानगीने फलक लावण्यासाठी उभारण्यात आलेली लोखंडी फ्रेम तात्काळ काढावी. तसेच ती लावलेल्या व्यक्तीवर अ‍ॅट्रासिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी आरपीआयच्यावतीने शुक्रवारी दुपारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सदरच्या प्रकारामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मागासवर्गीय मुलींचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह आहे. या संस्थेच्या वसतिगृहाच्या प्रवेशद्वारालगत बॅनर लावण्यासाठी गुरुवारी मध्यरात्री अचानक मोठ्या लोखंडी आकाराची फ्रेम तयार करीत ती मुख्य गेटच्या समोर जमिनीत पुरुन उभारण्यात आली. याकामी कर्जत नगरपंचायत किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाची कसलीही परवानगी घेण्यात आली नव्हती.

विना परवानगी आणि अनधिकृत लोखंडी फ्रेम आणि त्यावर लावण्यात येणारे फलक विद्यार्थिनींच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर असल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने सदरची लोखंडी फ्रेम आणि त्यावर लावलेला फलक तात्काळ काढावा. तसेच ते उभारण्यात येणार्‍या सर्व व्यक्तींवर अ‍ॅट्रासिटीनुसार गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केले.

याबाबत वरील आशयाचे निवेदन संस्थेचे वरिष्ठ लिपिक दत्तात्रय वाघमारे आणि डी. बी. गवळी यांनी पोलीस प्रशासनास दिले. या आंदोलनात आरपीआयचे विशाल काकडे, दत्ता कदम, नगरसेवक भास्कर भैलुमे, संतोष आखाडे, अनिल समुद्र, रोहन कदम, सोहम कदम, करण मोहोळ, किरण भैलुमे, अक्षय भैलुमे, सोमनाथ भैलुमे, गोदड समुद्र, अमजद शेख, वसीम शेख, सनी येळेकर, गोविंद गोरे, अमोल क्षीरसागर आदी सहभागी झाले होते.  या आंदोलनामुळे नगर-कर्जत-बारामती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याने आंदोलनस्थळी पोलीस प्रशासन सतर्क होते.

मुलींच्या शासकीय वसतिगृहाला लागून अनधिकृत फलक बोर्ड काढावा अशी मागणी होती. त्यानुसार कर्जत पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत वाकचौरे यांनी तो फलक बोर्ड दोन दिवसात काढण्याचे आश्वासन दिले आहे. आंदोलन मागे घेत आहोत. मात्र तो अनधिकृत फलक नाही निघाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलनकर्ते विशाल काकडे यांनी दिला.

तर आंदोलनकर्त्यांनी आपल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विना परवानगी फलक बोर्ड उभारला असल्यास संबंधित विभाग त्यावर उचित कार्यवाही करतील. सर्वानी शांतता पाळावी. कोणीही कायदा-सुव्यवस्था बिघडणार याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply