Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

टवाळखोरांवर कारवाईसाठी हिंदु जागृती समिती आक्रमक

तिसगावात महाविद्यालयीन विद्यार्थीनींची होणारी छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथक नेमण्याची मागणी

पाथर्डी । वीरभूमी- Feb 03, 2024 • 04:33 PM 1783 views

तालुक्यातील तिसगाव येथील बसस्थानक, वृद्धेश्वर चौक, शाळा महाविद्यालय परिसरात विद्यार्थिनींची होत असलेली छेडछाड रोखुन संबंधित टवाळखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी व याठिकाणी कायमस्वरूपी महीला पोलिसांचे दामिनी पथक नियुक्त करावे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने संतोष गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडे करण्यात आली.

याबाबतचे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे रामेश्वर भुकन, मुकुंद गारुडकर, भूषण पवार, सुनील लवांडे अखिल लवांडे, गणेश चोथे प्रवीण आव्हाड प्रसाद देशमुख विराज लवांडे, चैतन्य शेकडे, समर्थ मांजरे, संतोष बोरुडे, दिग्विजय देशमुख, विशाल माळवे, संदीप लवांडे, ओम शिंदे, रावसाहेब कोलते, किरण वाघ, अक्षय मरकड, सचिन जाधव, भास्कर लवांडे, रवी गायकवाड, महेश जेधे, संजय स्वामी, नामदेव  जायभाये, दीपक महाराज काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी रामेश्वर भुकन म्हणाले की, तिसगाव येथे शाळा महाविद्यालयात पंचक्रोशीतील अनेक जाती जमातीच्या हिंदू गोरगरीब विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. गेल्या काही काळापासून येथील टवाळखोर मुले विद्यालयात जाताना व येताना या अल्पवयीन विद्यार्थिणींसोबत सतत गैरवर्तन करतात. चौकामध्ये उभे राहून मुलींची छेड काढणे, पाठलाग करणे, त्यांच्याकडे बघून अश्लील हावभाव करणे इ. प्रकार कायम होत आहेत. अगदी वर्गात घुसून विद्यार्थिनींची छेड काढण्यापर्यंत या टारगट मुलांची मजल गेली आहे. यामुळे मुली व पालकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून परिणामी कित्येक मुलींचे शिक्षण थांबले आहे.

तरी संबंधित टारगट मुले व आरोपींवर तत्काळ कारवाई करावी. शाळा महाविद्यालय परिसर, बसस्थानक परिसर येथे तात्काळ दामिनी पथकाची नियुक्ती करावी. विद्यार्थिनी शिक्षणाचा व भविष्याचा विचार करून तक्रार करण्यास घाबरतात, त्यांना गुप्तपणे तक्रार करता यावी यासाठी महाविद्यालयात तक्रारपेटी उपलब्ध करून देण्यात यावी. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी नायब तहसीलदार श्री. बागुल यांनी निवेदन स्वीकारले व तातडीने पोलीस निरीक्षकांशी बोलुन या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त दिला जाईल व संबंधित समाजकंटकावर कारवाई करू तसेच वरिष्ठांशीही याबाबत पत्र व्यवहार करू असे आश्वासन दिले. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक, पोलिस अधीक्षक यांना ही पाठवण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply