Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

माजी आमदार हनी ट्रॅपच्या जाळ्यात?

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत मागितली एक कोटीची खंडणी । कोतवालीत दोन महिलांसह एकावर गुन्हा दाखल

नगर । वीरभूमी - Jun 29, 2024 • 03:21 PM 2331 views

अश्लिल व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत आष्टीचे माजी आ. भीमराव धोंडे यांचेकडे तब्बल एक कोटी रुपयांची खंडणी मागीतल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नगरच्या दोन महिलांसह तीनजणांवर कोतवाली पोलिस ठाण्यात शनिवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेने नगर जिल्ह्यासह आष्टी तालुक्यात एकच खळबळ उडाली असून हा हनी ट्रॅप असल्याचे बोलले जात आहे. कोतवाली पोलिस ठाण्यात स्वतः माजी आ. भिमराव धोंडे यांनी उपस्थित राहुन रितसर फिर्याद दाखल केली आहे.

या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी महिला कल्पना सुधीर गायकवाड (रा. नगर), महिला बांगर (पूर्ण नाव व पत्ता नाही), इस्माईल दर्यानी ऊर्फ भैय्या बॉक्सर (रा. नगर) यांनी संगनमत करून आमच्याकडे तुमची अश्लिल व्हिडिओ क्लीप आहे. ती सोशल मीडियावर प्रसारीत करून तुमची बदनामी करून तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू व तुमची राजकीय कारकिर्द संपवून टाकू, अशी धमकी देत माजी आ. भिमराव धोंडे यांच्याकडे तब्बल एक कोटींची खंडणी मागितल्याचे म्हटले आहे.

वरील आरोपींपैकी ईस्माईल दर्यानी ऊर्फ भैय्या बॉक्सर याने माजी आ. धोंडे यांचे स्वीय सहाय्यक जफर शेख यांच्याकडून यातील 25 हजार रुपये स्वीकारले. हा प्रकार जानेवारी-2024 या महिन्यापासून दि. 26 जून 2024 या कालावधीत नगरमधील एका हॉटेल मध्ये घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

यावरुन कोतवाली पोलिसांनी वरील तीनही आरोपीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोनि. प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. योगिता कोकाटे या करीत आहेत. या घटनेने नगर जिल्ह्यासह आष्टी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply