Skip to content
Breaking Live
डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले बोधेगावातील त्या खुनाचे रहस्य उलगडले डाळींब चोरी पकडली, पण उलट शेतकर्‍यांवर गुन्हा अहिल्यानगर जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर पाथर्डी पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर पाथर्डीतील अतिवृष्टी नुकसानाची पालकमंत्री विखेंकडून पहाणी कासार पिंपळगावातील पुरात अडकलेले 30 जण सुखरुप शेवगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट सौर कृषी पंप मंजुरीसाठी लाचखोरी पाथर्डीत आठवीतील विद्यार्थ्यावर चाकू हल्ला अखेर वासनांध शिक्षकांसह मध्यस्थी करणार्‍यांवर गुन्हा दाखल माणिकदौंडीमध्ये बलखंडी बाबांच्या पूजेसाठी हिंदू-मुस्लीम एकत्र शेवगाव तालुक्यात 48 ग्रामपंचायतींमध्ये महिलांना संधी नगर जिल्ह्यात होणार शिवपुराण कथा महोत्सव! पाथर्डीत पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाची धडाकेबाज कारवाई राहुरीत बनावट नोटांचे रॅकेट पकडले बोधेगावातील त्या खुनाचे रहस्य उलगडले

राज्यातील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

विधानसभा निवडणुकीची तयारी । निवडणुकीची तयारी सुरु

 मुंबई । वीरभूमी - Aug 30, 2024 • 09:54 PM 1611 views

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून मतदार याद्या अद्ययावत करण्याचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि.25 जून 2024 ते दि.30 ऑगस्ट 2024 या कालावधीत राबविण्यात आला. या कार्यक्रमानुसार आज दि.30 रोजी राज्यातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये, तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

विधानसभा मतदारसंघाच्या प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तसेच प्रारुप याद्यांसाठी दि.6 ऑगस्ट 2024 ते दि. 30 ऑगस्ट 2024 या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात आल्या. दि.6 ऑगस्ट रोजी प्रसिध्द केलेल्या प्रारुप मतदार यादीमध्ये एकूण 9 कोटी 36 लाख 75 हजार 934 मतदार होती. आता या उपक्रमानंतर प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतिम मतदार याद्यांनुसार राज्यात एकूण 9 कोटी 53 लाख 74 हजार 302 एवढे मतदार झालेले आहेत. प्रारुप मतदार यादीपेक्षा अंतिम मतदार यादीमध्ये 16 लाख 98 हजार 368 मतदारांची संख्या वाढलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकुण 37 लाख 27 हजार 799 मतदार संख्या झाली आहे.

दि. 6 ऑगस्ट 2024 रोजीच्या प्रारुप मतदार यादीमध्ये दिव्यांग मतदारांची संख्या 6,06,505 एवढी होती. आता दि. 30.08.2024 रोजीच्या अंतीम मतदार यादीनुसार दिव्यांग मतदारांची नोंदणी 6,28,063 इतकी झालेली आहे. त्यानुसार अंतीम मतदार यादीमध्ये दिव्यांग मतदारामध्ये 21,558 इतक्या संख्येने वाढ झालेली आहे.

महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायट्या यांच्या सहकार्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये महिलांच्या मतदार नोंदणीत लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर 925 वरून 933 इतके वाढलेले आहे. या कार्यक्रमांतर्गत दावे व हरकतीच्या कालावधीमध्ये नव्याने नोंदणी केलेल्या मतदारांना, नोदींमध्ये दुरुस्ती केलेल्या मतदारांना मतदान छायाचित्र ओळखपत्र देण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. या कार्यक्रमानुसार अंतिम मतदार यादी जरी प्रसिद्ध करण्यात आलेली असली, तरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूका-2024 मध्ये नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेच्या आधी 10 दिवसांपर्यंत नाव नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. अंतिम मतदार यादीमध्ये नागरिकांनी आपली नावे तपासून घ्यावीत व अद्ययावत करावीत. ज्यांची नावे यादीत नाहीत त्यांनी अर्ज सादर करून नाव नोंदणी करावी. मतदारांनी आपले नाव जुन्या मतदान केंद्रात नसेल, तर नजिकच्या मतदार केंद्रात असल्याची खात्री करून घ्यावी किंवा व्होटर हेल्प लाईन पवर जाऊन मतदान केंद्राचा पर्याय निवडावा व आपले नाव असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply