Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

मेंढ्यांना पाणी पाजायला गेले अन् जीव गमावला

शेततळ्यात पडून सून व सासर्‍याचा दुदैवी मृत्यू

 पारनेर । वीरभूमी - Sep 04, 2024 • 06:34 PM 1336 views

पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील हिंगणदरा वस्तीवर मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी शेततळ्यातून पाणी काढण्यासाठी गेलेल्या सूनेचा पाय घसरून शेततळ्यात पडल्यामुळे तीला वाचवण्यासाठी सासर्‍याने तात्काळ धाव घेतली. मात्र त्यांनाही पोहता येत नसल्यामुळे सून व सासर्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारनेर तालुक्यातील हिवरा कोरडे येथील मुरलीधर मारुती नवले (वय 70 वर्ष) हे आपल्या मेंढ्या चारत होते. त्यांची सून उज्वला आबा नवले (वय 40 वर्ष) आपल्या मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी शेततळ्यावर गेली. शेततळ्यातून पाणी काढताना पाय घसरून त्या शेततळ्यात पडल्या. उज्वला नवले या शेततळ्यात पडल्याचे दिसताच शेजारी मेंढ्या चारणारे सासरे मुरलीधर नवले यांनी धाव घेत शेततळ्यात उडी घेतली. मात्र सासरे मुरलीधर नवले हे वयोवृद्ध असल्यामुळे ते सूनेचा प्राण वाचवण्यासाठी अपयशी ठरले.

या घटनेमध्ये सून व सासर्‍याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या घटनेची माहिती तात्काळ पारनेर पोलिसांना कळविण्यात आली. तोपर्यंत ग्रामस्थांच्या मदतीने मुरलीधर नवले व उज्वला नवले यांचे मृतदेह बाहेर काढून पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मानसिंग शेलार, पोना. सतीश बर्डे हे करत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply