Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

गहाळ मोबाईल मिळाले, आरोपी कुठंय?

शेवगाव पोलिसांची कामगिरी । एक लाख रुपये किंमतीचे 8 मोबाईल संच मुळ मालकांना केले परत

शेवगाव । वीरभूमी - Sep 11, 2024 • 12:44 PM 1372 views

शेवगाव तालुक्यातील आठवडे बाजार, बसस्थानक व इतर गर्दीच्या ठिकाणाहून गहाळ झालेले 1 लाख रुपये किंमतीचे आठ मोबाईल संच संबंधीत मुळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले. हे मोबाईल संच कोणाकडून हस्तगत करण्यात आले हे मात्र स्पष्ट होत नाही. मात्र पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी दिली.

शेवगाव शहरामध्ये आठवडे बाजार, बसस्थानक व इतर गर्दीच्या ठिकाणाहून नागरिकांचे महागडे मोबाईल चोरीस जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरीस गेलेल्या मोबाईलचा गैरवापर होवू नये, संबंधीत मोबाईल नंबर पुन्हा मिळावा यासाठी नागरिक पोलीस ठाण्यात जावून मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी देतात. या तक्रारीवरुन शेवगाव पोलीसांनी शोध मोहीम राबवली. त्यामध्ये गहाळ झालेल्या मोबाईल पैकी 8 मोबाईल संच पोलीसांनी शोधून काढले. मात्र हे मोबाईल कोणाकडून हस्तगत केले हे मात्र स्पष्ट झाले नाही.

हस्तगत केलेले 1 लाख रुपये किंमतीचे आठ मोबाईल संच मंगळवार दि. 10 रोजी पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांनी संबंधीत मुळ मालकांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांच्या स्वाधीन केले. याबाबत पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या प्रेसनोट मध्ये ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलीस अधिकारी  सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे, पोहेकाँ. परशुराम नाकाडे, पोकॉ. शाम गुंजाळ, संतोष वाघ, एकनाथ गरकळ, राहुल खेडकर, बप्पासाहेब धाकतोडे, प्रशांत आंधळे, संपत खेडकर यांनी केल्याचे  म्हटले आहे.

मात्र हे मोबाईल संच कोणाकडून हस्तगत केले याबाबत पोलिसांना सांगता आले नाही. यामुळे गहाळ झालेले मोबाईल संच कोणाकडून मिळाले याचे कोडे उलगडले नाही.

आरोपी नसलेली कामगिरी

पोलिसांना मिळालेले मोबाईल संच हे मुळ मालकांना पोलिस ठाण्यात बोलावून त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. मात्र हे मोबाईल पोलिसांना कसे मिळाले हे पोलिस सांगू शकले नाहीत. अनेकवेळा आरोपी पकडल्यानंतर त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला जातो. यातून अनेक गुन्हे उघड होतात. मोबाईल संच गहाळ झाल्यानंतर त्याच क्रमांकाचे सिमकार्ड मिळण्यासाठी अनेकजन पोलिस ठाण्यात येवून तक्रार देतात. या तक्रारीच्या आधारे मालकांचा शोध घेवून ते परत करण्यात आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply