Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

शेवगाव मतदार संघात तीन जणांचे अर्ज दाखल

पहिल्याच दिवशी 18 जणांनी घेतले 46 अर्ज

शेवगाव । वीरभूमी - Oct 22, 2024 • 04:45 PM 4365 views

शेवगाव-पाथर्डी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी तीन इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर 18 जणांनी 46 अर्ज घेतले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी दिली.

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी राजेंद्र रंगनाथ ढाकणे (अपक्ष), पांडुरंग गोरक्ष शिरसाट (अपक्ष), हर्षदा विद्याधर काकडे (अपक्ष) या तीन इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले. तर 18 इच्छुकांनी तब्बल 46 अर्ज नेले आहेत.

शेवगाव तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तेथे प्रशासनाच्यावतीने इच्छुकांच्या मदतीसाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन प्रांताधिकारी प्रसाद मते हे काम पहात असून त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणुन तहसीलदार प्रशांत सांगडे व तहसीलदार उद्धव नाईक हे काम पहात आहेत.

शेवगाव-पाथर्डी मतदार संघात वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. किसन चव्हाण, भाजपाकडून मोनिका राजळे यांना उमेदवारी जाहीर झाल्या आहेत. मात्र अद्याप महाविकास आघाडीची उमेदवारी जाहीर होणे बाकी आहे. महाविकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळते, याकडे मतदारांचे लक्ष लागून राहीले आहे. मात्र ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार हे नक्की.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply