Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

आ. राजळेंवरील दगडफेकीचा कासार पिंपळगावात निषेध

मूकमोर्चा काढून ग्रामस्थांकडून कडकडीत बंद । ग्रामस्थांची लक्षणिय उपस्थिती

पाथर्डी । वीरभूमी - Nov 21, 2024 • 02:22 PM 3021 views

तालुक्यातील शिरसाटवाडी येथे आ. मोनिका राजळे यांच्यावर झालेल्या दगडफेकीच्या घटनेचा कासार पिंपळगाव ग्रामस्थांनी चौकसभा घेवून जाहीर निषेध केला. यावेळी गावात व हद्दीतील वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना येथील सर्व व्यवहार बंद ठेवून गावातून मूकमोर्चा काढण्यात आला.

शेवगाव-पाथर्डी विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान सुरु असतांना भाजपाच्या उमेदवार आ. मोनिका राजळे या शिरसाटवाडी येथील मतदान केंद्रावर भेट देण्यासाठी सायंकाळच्या सुमारास गेल्या होत्या. मात्र तेथे गेल्यानंतर विरोधी उमेदवाराच्या घोषणा देत मोठा जमाव जमा होवनू आ. राजळेंच्या दिशेने दगडफेक करण्यात आली.

या दगडफेकीत आ. राजळे यांच्या सोबत असलेले चार जण किरकोळ जखमी झाले. आ. राजळे यांच्या खांद्यालाही मार लागला. या घटनेची माहिती कळताच पाथर्डी तालुक्यासह शेवगाव तालुक्यातून हजारो कार्यकर्ते पाथर्डीत जमा झाले होते. मात्र या घटनेनंतर आ. राजळे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत परत माघारी जाण्याचे सांगितले. यामुळे तणावाची परिस्थिती निवळी.

दुसर्‍या दिवशी गुरुवारी राजळे यांचे गाव असलेल्या कासार पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी सकाळी निषेध सभा घेतली. यावेळी अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत हा हल्ला आ. राजळे यांच्यावरील नसून तो लोकशाहीवर असल्याचे सांगत एका महिलेवर भ्याड हल्ला करणार्‍यांचा निषेध केला. यावेळी कासार पिंपळगावासह वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना येथील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली.

निषेध सभेनंतर गावातून मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये सर्वपक्षिय ग्रामस्थ, तरुणांसह महिलांही सहभागी झाल्या होत्या.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply