Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

लाच मागणार्‍या तलाठ्यावर गुन्हा दाखल

खरेदी खताची नोंद करण्यासाठी मागितली होती लाच । नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तक्रारीची पडताळणी

अहिल्यानगर । वीरभूमी- Dec 06, 2024 • 12:41 PM 1875 views

तक्रारदाराने खरेदी केेलेल्या जमिनीची सातबारा उतार्‍यावर नोंद करण्यासाठी 10 हजाराची लाच मागणी केल्याप्रकरणी हाळगावचे तत्कालिन तलाठ्यावर जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाच मागणार्‍या तलाठ्याचे नाव मुजीब अब्दुलरब शेख (वय 51 वर्षे, सध्या नेमणुक सजा सावरगावतळ, ता. संगमनेर. रा. नवी पेठ, कर्जत, जि. अहिल्यानगर) असे असून 30 मे 2024 रोजी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक अहिल्यानगर विभागाकडे लाच मागणी केल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर आज जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अहिल्यानगर येथील लाचलुचपतचे पोलिस उपअधिक्षक अजित त्रिपुटे यांचेकडे दि. 30 मे 2024 रोजी तक्रारदार यांनी तलाठी यांची तक्रार केली होती. या तक्रारीत म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील हाळगाव येथील गट नंबर 155 मधील 1 हेक्टर 10 आर व गट नं. 154 मधील 2 हेक्टर 30 आर क्षेत्र तक्रारदार यांच्या वडीलांनी खरेदी केले होते. सदर खरेदी खताची नोंद सातबारा उतार्‍यावर लावण्याच्या मोबदल्यात हाळगाव सजेचे तत्कालिन तलाठी मुजीब अब्दुलरब शेख यांनी तक्रारदार यांचेकडे 10 हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

तक्रारदार यांनी अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपिअधक्षक अजित त्रिपुटे यांचेकडे दि. 30 मे 2024 रोजी संबधित तलाठी यांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार केली होती. या तक्रारीची पडताळणी कारवाई केली असता तत्कालिन तलाठी मुजीब अब्दुलरब शेख यांनी नमुद खरेदी खताची नोंद सातबारा उतार्‍यावर लावण्यासाठी पंचासमक्ष 10 हजार रुपये लाच स्विकारण्याची तयारी दर्शवल्याचे स्पष्ट झाल्याने संबधित तलाठ्यावर जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कामी लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे, पोहेकॉ. संतोष शिंदे, पोना. चंद्रकांत काळे, पोलिस अंमलदार रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, चापोहेकॉ. हारुन शेख यांच्या पथकाने केली.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply