Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

श्रीगोंद्यात लाच मागणारा पोलिस हवालदार रंगेहात पकडला

अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई । श्रीगोंदा तालुक्यात खळबळ

अहिल्यानगर । वीरभूमी - Feb 27, 2025 • 10:34 PM 1489 views
श्रीगोंदा पोलिस ठाण्यात तक्रारदार व त्यांचे इतर 13 नातेवाईक यांचे विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागणार्‍या पोलिस हवालदाराला पंचासमक्ष सात हजार रुपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. लाचखोर पोलिस हवालदाराचे नाव संतोष सुधाकर फलके (वय 40 वर्षे, सध्या रा. जकाते वस्ती, दिगंबर बढे यांच्या फ्लॅटमध्ये भाडोत्री, श्रीगोंदा. मूळ रा. प्लॉट नं. 13, शिवनगर, सावेडी, अहिल्यानगर) असे आहे. या घटनेने श्रीगोंदा पोलिस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीगोंदा पोलिस ठाण्यात तक्रारदार व त्यांचे 13 नातेवाईकांवर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार संतोष सुधाकर फलके यांचेकडे आहे. तक्रारदार व त्यांचे 13 नातेवाईक यांचेवर दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी तपासी अधिकारी संतोष फलके याने तक्रारदार यांचेकडे 20 हजार रुपयांची लाच मागीतली होती. याबाबतची तक्रार 27 फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती.

सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दि.27/02/2025 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक संतोष फलके, पोलीस हवालदार यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष त्यांच्याविरुद्ध व इतर 13 नातेवाईक यांचेविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याचे तपासात मदत करण्यासाठी प्रत्येकी 500 प्रमाणे एकूण 7 हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.

दि.27/02/2025 रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक फलके यांनी तक्रारदार यांचे कडून 7 हजार रुपयाची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला.

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्यासह महिला पोलीस हवालदार राधा खेमनर, पोलीस कॉन्स्टेबल गजानन गायकवाड, चापोहेकॉ. दशरथ लाड यांच्या पथकाने केली.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply