Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

परीक्षेआधीच प्रश्नपत्रिका रस्त्यावर

शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार उघड

विजय उंडे । वीरभूमी- Mar 28, 2025 • 06:12 PM 1824 views
श्रीगोंदा ः शहरात दि. 28 रोजी पहाटेच्या सुमारास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन - 2 2024-25 वर्षासाठी इयत्ता चौथीच्या मराठी माध्यमाच्या गणित विषयाच्या सुमारे 508 प्रश्नपत्रिका दौंड ते जामखेड महामार्गावर विखुरलेल्या अस्वस्थेत पडल्या होत्या. सजग नागरिकांनी सर्व प्रश्नपत्रिका गोळा करून पोलीस ठाण्यात जमा केल्या.

याबाबत अधिक माहिती अशी की, वीरभूमी वर्तमानपत्राचे तालुका प्रतिनिधी विजय उंडे नेहमीप्रमाणे मित्रांसोबत पहाटे व्यायामाला चालले होते. छत्रपती महाविद्यालया समोरील जामखेड-दौंड महामार्गावर त्यांना अर्धा किलोमीटर अंतरात या प्रश्नपत्रिका विखुरलेल्या अस्वस्थेत आढळून आल्या.

सर्वांनी मिळून विखुरलेल्या तब्बल 508 प्रश्नपत्रिका गोळा केल्या व पोलिस ठाण्यात जमा केल्या. यावेळी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी पंचायत समिती शिक्षणाधिकारी सत्यजित मच्छिंद्र यांना बोलावून त्यांच्याकडे सुपूर्द केल्या.

यावेळी शिक्षणाधिकारी श्री. मच्छिंद्र यांनी शिक्षण विभागाकडे अधिक चौकशी केली असता या प्रश्नपत्रिका बीड जिल्ह्यातील आष्टी पंचायत समिती शिक्षण विभागात जाणार होत्या. परीक्षेआधी तालुक्यातील शाळांमध्ये वितरित केल्या जाणार होत्या.

पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या स्टार्स प्रकल्पांतर्गत इयत्ता चौथीसाठी मराठी माध्यमाच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका होत्या. राज्य शिक्षण विभागाने शिरीष कार्गो या मालवाहतूक कंपनीकडे वितरणाचा ठेका दिला होता. या कंपनीने निष्काळजीपणा दाखविल्यामुळेच प्रश्नपत्रिका रस्त्यावर पडल्या होत्या.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply